अहमदनगर -राहुरी तालुक्यातील मुळा धरणात मोठ्याप्रमाणात मत्स्य उत्पादन घेतले जाते, त्यामधील विशेषत: चिलापी माशांना थेट परदेशात निर्यात केले जात आहे. गोड्या पाण्यातील या चिलापी माशांना दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात निर्यात केले जात आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय करण्याऱ्यांना कोरोनाच्या मंदी नंतर आता मोठा दिलासा मिळाला आहे. धरणात पिंजरा पद्धतीने मत्स्य पालन केले जात आहे आणि ते फायद्याचेही ठरत आहे.
गोड्या पाण्यातील या चिलापी आणि काळे मासे राहुरी तालुक्यातील मुळा धरणाचे पाणी विस्तीर्ण स्वरुपात पसरलेले आहे. हरिश्चंद्रगडवर उगम पावणार्या मुळा नदीवर राहुरी जवळ मुळा धरण असुन याच पाणी शुध्द मानल जाते. त्यामुळे या ठिकाणी मत्स्य उत्पादनास चांगला वाव होता. मुळा धराणातील गोड्या पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन येथील काही मत्स्य व्यावसाय़िकांनी मत्स्य विभागाच्या सहकार्याने केंज फिश फार्मिंग म्हणजे पिंजरा पध्दतीने मत्स्य पालनाला सुरुवात केली. मुळा धरणाच्या जलसाठ्यात जवळपास 80 पेक्षा जास्त मत्स्य पिंजरे उभे करण्यात आले. या मत्स्त्य उत्पादनासाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिलापी जातीचे मत्स बीज सोडण्यात आले. तसेच मत्स्य बिजांच्या वाढीसाठी योग्य वातावरण आणि खाद्याचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे माशांची वाढ चांगल्या प्रमाणात झाली.
मुळाधरणातील माशांना थेट दक्षिण आफ्रिकेतून मागणी चिलापी माशांच्या उत्पादनाकडे कल-
मुळा जलाशयात सुरू असलेल्या मत्स्य संवर्धन व्यवसायात अनेक उच्च शिक्षीत तरुणांचा सहभाग आहे. त्यामुळे या तरुणांनी पांरपरिक मासेमारीला फाटा देत बाजारात मागणी असणाऱ्या माशांचे उत्पादन घेण्याचे नियोजन केले. गोड्या पाण्यातील चिलापी काळ्या आणि गुलाबी माश्यांना महाराष्ट्रातून मोठी मागणी असते. त्यामुळे त्यांनी या जातीच्या माशांच्या उत्पादनास प्राधान्य दिले. तसेच या माशांना मिळणारा दरही चांगला आहे.
माशांना परदेशातून मागणी -
तरुणांनी सुरू केलेल्या या मस्त्य व्यवसायाला चांगले दिवस सुरू असतानाच गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनचा फटका बसला. यावर उपाय म्हणून या माशांची विक्री करण्यासाठी त्यांनी परदेशातील बाजारपेठाचा पर्याय अंवलंबून पाहिला. तर आता या माशांना परदेशातूनही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. या मत्स्य व्यावसायिकांनी थेट परदेशात या माशांची निर्यात सुरू केली. सध्य स्थितीत मुळा धरणातील तब्बल 150 टन माशांची ऑर्डर मिळाल्याने हा माल मुंबई मार्गे थेट दक्षीण अफ्रिकेत निर्यात केला जाणार असल्याचे येथील मत्स्य व्यावसायिकांनी सांगितले. त्याचा या व्यावसायिकांना मोठ्या प्रमामाणात आर्थिक फायदा होणार आहे.
पिंजरा पद्धतीने मत्स्य पालन समुद्री माशांप्रमाणेत आता गोड्या पाण्यातील माशांनाही देशांतर्गत आणि विदेशातून मोठी मागणी वाढु लागली आहे. चिन आणि इंडोनेशीया सारख्या देशांची माश्याच्या निर्यातील मक्तेदारी आता भारत मोडु पहात आहेत. राज्याच्या आणि केंद्राच्या मत्स संवर्धन विभागाकडुन पिंजर्यातील मत्स व्यवसायासाठी साठ टक्के सबसीडी दिली जाते. अर्थात हा प्रकल्प उभारण्याची एका मध्यम युनिटचा खर्चही जवळपास सत्तर लाखाच्या आस पास येतो मात्र वर्षाकाठी पंचवीस लाख उत्पन्न देणाऱ्या या व्यवसायाकडे अनेकांचा ओढा असल्याच दिसून येत आहे.