अहमदनगर Manoj Jarange On Chhagan Bhujbal :मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात सध्या चांगलाच तापलाय. त्यातच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांनी विरोध केल्यानंतर हा वाद आणखी चिघळला. यावरून आता छगन भुजबळ आणि मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटलांनी एक खळबळजनक दावा केला.
जरांगे पाटलांनी काय दावा केला : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ हे भाजपाच्या वाटेवर असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जरांगे पाटील गेल्या दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, नेवासा येथील सभेच्या आधी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला. छगन भुजबळ यांना भाजपामध्ये पलटी मारायची असल्याचं ते म्हणाले. जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यानं राज्यातील राजकीय वातावरण तापत आहे.
धनगर आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करा : भुजबळ यांनी अशी भूमिका घेण्यामागचं कारण काय? असं विचारलं असता, त्यात त्यांचा राजकीय स्वार्थ आहे. राज्यात दंगली पेटवून राजकीय पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं जरांगे पाटील म्हणाले. "तुम्ही सावित्रीबाई फुलेंचा आदर्श घेतला असं म्हणता. मात्र तुम्ही एकाही शिक्षण संस्थेला त्यांचं नाव दिलं नाही. जातीय तेढ निर्माण करणं हे तुमचं पुरोगामित्वं आहे का? तुम्ही ओबीसींचा, बहजुनांचा नेता म्हणून का मिरवताय? तुम्ही सगळ्या ओबीसी बांधवांना एकत्र करताय. तर तुमची धनगर आरक्षणाबाबतची भूमिका काय आहे, ते स्पष्ट करा. तुम्ही अद्याप ती भूमिका स्पष्ट केलेली नाही. सभेला गर्दी जमवायची आणि त्याचा वापर करून घ्यायचा", असे तिखट आरोप जरांगे पाटलांनी भुजबळांवर केले.
हेही वाचा :
- 'भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा', मराठा आंदोलकांची मागणी
- मुख्यमंत्र्याच्या ठाण्यात मराठा समाजाचे जोरदार शक्तिप्रदर्शन; जरांगे पाटील यांचा सरकारवर कारस्थान केल्याचा आरोप
- अंबडमध्ये ओबीसी आरक्षण बचाव सभेचं आयोजन, वाचा सविस्तर