अहमदनगर - राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सध्या पक्षांतर करण्याच्या द्विधा मनस्थितीत आहेत. त्यांनी शिवसेनेमध्ये न जाता आमच्या रिपब्लिकन पक्षामध्ये यावे, असे आमंत्रण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी येथे बोलताना दिले. जिल्ह्यातील संगमनेर येथील प्राध्यापक कॉलनीतील रस्त्याच्या कामांचे लोकार्पण आठवलेंच्या उपस्थितीत संपन्न झाले, यावेळी ते बोलत होते.
आठवलेंचे छगन भुजबळांना आमंत्रण.. म्हणतात शिवसेनेत न जाता आरपीआयमध्ये यावे
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री भुजबळांनी रिपब्लिकन पक्षात आल्यामुळे ओबीसी वर्ग मजबूत होईल आणि आरपीआयला ही मदत मिळेल. त्यामुळे त्यांनी सेनेत न जाता रिपब्लिकन पक्षात यावे, असे आमंत्रण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भुजबळ यांना अहमदनगर येथे बोलताना दिले.
आठवले पत्रकारांशी बोलाताना म्हणाले, भुजबळांनी रिपब्लिकन पक्षात आल्यामुळे ओबीसी वर्ग मजबूत होईल आणि आरपीआयला ही मदत मिळेल. तर भाजप-सेना युती बाबत बोलताना त्यांनी युती न झाल्यास भाजपला 175 जागा मिळतील, असा दावाही यावेळी केला. मात्र, शिवसेनेला बरोबर घेऊनच निवडणूक लढवू असेही ते म्हणाले.
आगामी विधानसभेमध्ये भाजप-सेनेची युती झाल्यास या दोन्ही पक्षांसाठी 135-135 जागा तर इतर जागा मित्रपक्षांना देण्यात येतील, असे त्यांनी म्हटले आहे. तर यामध्ये आरपीआयने दहा जागांवर दावा केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.