महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्जमाफीसाठी ऑनलाईनच्या नावाखाली नागवणाऱ्यांना आता जाब विचारा - छगन भुजबळ - Ahmednagar NCP News

कर्जत- जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली.

छगन भुजबळ यांची कर्जत-जामखेड मतदार संघात सभा

By

Published : Oct 14, 2019, 4:24 PM IST

अहमदनगर - कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ नान्नज येथे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सोमवारी एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना भुजबळ यांनी भाजप सरकारने कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईनच्या नावाखाली खूप मनस्ताप दिल्याचे सांगत आता भाजपचे उमेदवार मत मागायला आल्यावर त्यांचीही पात्रता ऑनलाईन द्यायला सांगा, असे सांगत टीका केली.

छगन भुजबळ यांची कर्जत-जामखेड मतदार संघात सभा

भाजपच्या सरकारमध्ये अनेकवेळा येणारा तत्वतः याविषयाची पण त्यांनी या मुद्यावर खिल्ली उडवली. रोहित यांच्या विरोधात निवडणुकीत असलेले पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर निशाणा साधताना शिंदेंची धनगर आणि ओबीसी प्रशांवर उदासीनता पाहता ते अहिल्याबाई होळकर घराण्याचे वंशज असू शकत नाहीत, असा टोला लगावला. शिंदे-होळकर घराण्याचे खरे वंशज या व्यासपीठावर असल्याचे त्यांनी अक्षय शिंदे यांचे नाव घेत सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details