महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेखा जरे हत्या प्रकरणी पाच आरोपींवर दोषारोपपत्र दाखल; बोठे फरारच - Chargesheet filed against five accused

रेखा जरे यांची हत्या करणाऱ्या पाच आरोपींविरोधात सातशे तीस पानांचे चार्जशिट (दोषारोपपत्र) पारनेर न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

accused
अटक केलेले आरोपी

By

Published : Feb 26, 2021, 8:42 PM IST

अहमदनगर -यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करणाऱ्या पाच आरोपींविरोधात सातशे तीस पानांचे चार्जशिट (दोषारोपपत्र) पारनेर न्यायालयात सादर केल्याचे या प्रकरणाचे तपासी अधिकारी आणि नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी सांगितले.

तपासी अधिकारी अजित पाटील

अटकेत असलेल्या या आरोपींवर दोषारोपपत्र सादर-

जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ बोठे अद्यापही फरार आहे. तो अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याविरोधात स्वतंत्र पुरवणी दोषारोपपत्र (चार्जशीट) सादर करण्यात येणार आहे. ज्ञानेश्वर उर्फ गुड्डू शिवाजी शिंदे (श्रीरामपूर),फिरोज राजू शेख (राहूरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रुक), सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार (नगर) या आरोपींविरोधात शुक्रवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

जातेगाव घाटात झाली होती हत्या-

३० नाहेंबर रोजी नगर पुणे महामार्गावर जातेगाव घाटात रेखा जरे यांची गळा चिरून निर्घुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी जरे यांच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती तर हत्येचा मुख्य सूत्रधार वरिष्ठ पत्रकार बाळ बोठे आद्यपीही फरार आहे. जरे यांच्यावर हल्ला करणा-या दोघांपैकी एकाचा फोटा जरे यांच्या मुलाने काढला होता. याच फोटोवरून पोलिसांनी दोघाही आरोपींना तात्काळ जेरबंद केले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी तिघांना अटक करण्यात आली.

अटक आरोपींनी केली बोठेची पोलखोल-

अटक आरोपींची चौकशी करण्यात आली असता बाळ बोठे हा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार असल्याची माहीती पुढे आली. सागर भिंगारदिवे मार्फत त्याने जरे यांच्या हत्येेची सुपारी दिली होती.त्यानंतर मोबाईल सीडीआरवरून रेखा जरे यांच्या हत्येचा बोठे हाच सुत्रधार असल्याचे स्पष्ट झाले होते.पाच आरोपी अटक करण्यात आल्यानंतर मुख्य आरोपी बोठे हा आजूनही फरारच आहे. त्याच सत्र न्यायालय, उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. आता त्याने सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details