महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर पीडिता आणि पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न, दोन अज्ञात पोलिसांसह दहा जणांवर गुन्हा दाखल

सामूहिक बलात्काराची फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह पतीलाही बांधून विवस्त्र करून पेट्रोल टाकून अमानूष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरात घडली होती. याप्रकरणी पीडिता आणि पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या २ अज्ञात पोलिसांसह एकूण १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडिता आणि पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अज्ञात पोलिसांसह दहा जणांवर गुन्हा दाखल
पीडिता आणि पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अज्ञात पोलिसांसह दहा जणांवर गुन्हा दाखल

By

Published : Mar 3, 2020, 6:10 AM IST

Updated : Mar 3, 2020, 6:55 AM IST

अहमदनगर -सामूहिक बलात्काराची फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह पतीलाही बांधून विवस्त्र करून पेट्रोल टाकून अमानूष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरात घडली होती. याप्रकरणी पीडिता आणि पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या २ अज्ञात पोलिसांसह एकूण १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडिता आणि पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अज्ञात पोलिसांसह दहा जणांवर गुन्हा दाखल

सन २०१६ मध्ये अत्याचार होऊन अद्याप न्याय न मिळालेल्या पीडितेस आणि तिच्या पतीला विवस्त्र करत अंगावर पेट्रोल टाकत अमानुषपणे मारहाण करणाऱ्या एकूण १० आरोपींविरोधात अहमदनगर पोलिसांनी अखेर रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींमध्ये पीडितेने २ अज्ञात पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. याबाबत रात्री महिला दक्षता समितीच्या सदस्यांच्या उपस्थित गृह विभागाच्या उपअधीक्षका प्रांजल सोनवणे यांनी पीडिता आणि तिच्या पतीचा पंचासमक्ष जबाब नोंदवून घेतला आहे. तसेच आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न, अपहरण, लैंगिक शोषण आदी कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Last Updated : Mar 3, 2020, 6:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details