महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सरपंच परिषद महाराष्ट्र'च्या माध्यमातून देश बदलण्याची ताकद -अण्णा हजारे - सरपंच परिषद ल्यूज

राज्यातील सरपंचांचे अनेक प्रश्न असून परिषदेच्या माध्यमातून ते सोडवण्यात येतील, त्याचबरोबर अण्णांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार परिषद काम करेल, असा विश्वास परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय काकडे यांनी यावेळी व्यक्त केला.

अण्णा हजारे

By

Published : Nov 1, 2019, 2:01 PM IST

Updated : Nov 1, 2019, 3:14 PM IST

अहमदनगर- गाव बदलले तर देश आणि देशाची अर्थव्यवस्था बदलणार आहे. त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या 'सरपंच परिषद, मुंबई (महाराष्ट्र) च्या माध्यमातून राज्यातील सरपंचांनी एकत्र येत ग्रामविकासासाठी प्रामाणिकपणे काम केल्यास देश बदलण्याची ताकद या परिषदेमध्ये असेल, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. राळेगणसिद्धी येथे नव्याने गठीत करण्यात आलेल्या सरपंच परिषदेच्या बोधचिन्हाचे अनावरण अण्णांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सदस्य नोंदणीस प्रारंभ करण्यात आला.

सरपंच परिषदेच्या बोधचिन्हाचे अनावरण अण्णांच्या हस्ते

हेही वाचा -२०५० मध्ये मुंबई बुडणार! वाचवायची असेल तर भुयारी मेट्रोचे काम थांबवा - गिरीष राऊत

राज्यातील सारपंचांचे अनेक प्रश्न असून परिषदेच्या माध्यमातून ते सोडवण्यात येतील, त्याचबरोबर अण्णांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार परिषद काम करेल, असा विश्वास परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय काकडे यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमास राज्यभरातील परिषदेचे सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.

Last Updated : Nov 1, 2019, 3:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details