महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ईडी'च्या नोटीसवरून एवढा आकांडतांडव का? चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 'ईडी'च्या नोटीसवरून विधान परिषदेततील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोदी, फडणवीस हे आकसबुद्धीने ईडीचा वापर करत असल्याच्या आरोप केला होता. त्या आरोपावर बोलताना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी विरोधक नोटीसवरून एव्हढे आकांडतांडव का करत आहेत, असा प्रतिप्रश्न केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे

By

Published : Aug 22, 2019, 8:59 PM IST

अहमदनगर - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) बजावण्यात आलेल्या नोटीसवरून चोहीकडून टीका होत आहे. तर, विरोधक नोटीसवरून एवढा आकांडतांडव का करत आहे असा प्रश्न राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित केला आहे.

'ईडी'च्या नोटीसवरून एवढा आकांडतांडव का? चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना सवाल


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 'ईडी'च्या नोटीसवरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोदी, फडणवीस हे आकसबुद्धीने ईडीचा वापर करत असल्याच्या आरोप केला होता. त्या आरोपावर बोलताना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी विरोधक नोटीसवरून एव्हढे आकांडतांडव का करत आहे, असा प्रतिप्रश्न केला आहे. सरकार कुठल्याही आकसबुद्धीने काम करत नसून ईडीच्या नोटीसीचा संबंध नसल्याचे ते म्हणाले. नोटीस आली तर तिला पुराव्यानिशी सामोरे जाण्याचे सोडून विरोधकांनी उगाच आकांडतांडव करण्याचे सोडून द्यावे, धनंजय मुंडे यांना खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करण्याची सवय असल्याचा टोलाही बावनकुळे यांनी मुंडे यांना लगावला.

ABOUT THE AUTHOR

...view details