अहमदनगर - राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची तीन दिवसीय संयुक्तिक संशोधन बैठक आज राहुरी विद्यापीठात संप्पन्न झाली. कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील शेतकरी सुखी, आनंदी आणि सुरक्षीत कसा राहील यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याची अपेक्षा या कार्यक्रमात व्यक्त केली.
शेतकऱ्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रयत्न करण्याची गरज - कृषीमंत्री चंद्रकांत पाटील राज्यातील चारही कृषी विद्यापिठाची 47 वी कृषी संशोधन बैठक राहुरी विद्यापीठात आयोजीत केली गेली होती . तीन दिवसीय या बैठकीचा कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज समारोप करण्यात आला. राज्यातील शेतकऱ्यांना उपयुक्त असे नवनवीन कृषी तंत्रज्ञान विद्यापिठामध्ये संशोधित केले जात आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठात या वर्षी नव्याने शोधलेले तंत्रज्ञान, शिक्षण आणी यंत्र याचे सादरीकरण राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात पार पडले. चारही विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या नवीन शिफारशींचा उहापोह तीन दिवस राहुरी विद्यापीठात पार पडला. यातील सर्वमान्य अशा शिफारशी सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे.
शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या नवनविन तंत्रज्ञान आणी वाणांची चंद्रकांत दादा यांनी माहीती जाणून घेतली. विद्यापीठाने विकसीत केलेल्या ड्रोन फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर केवळ पारंपरिक शेती करून चालणार नाही. शास्त्रज्ञांनी दिलेले नवनविन तंत्रज्ञानच हे शक्य करू शकते असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. राज्यातील शेतकरी सुखी, आनंदी आणी सुरक्षीत कसा राहील यासाठी प्रयत्न सुरू असून त्यात कृषी विद्यापिठांचा वाटा मोठा असल्याचे कृषी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
कृषी विद्यापीठात सुरू असलेले संशोधन खरच शेतकऱ्यापर्यंत पोहचतंय का? याचा विचार होणे गरजेचे असून आगामी काळात आपल्या संशोधनची दिशा ठरवणे गरजेचे असल्याचे कृषी सचिव डौले यांनी म्हटलं आहे. राज्यात सर्वात जास्त घेतल्या जाणाऱ्या कापूस, तुर, हरबरा, तांदूळ यासारख्या पाच सहा पिकांवरच चारही विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी लक्ष केंद्रीत करून आपल्या संशोधनातून या पिकांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी ते म्हणाले.
2022 पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारने विडा उचलला आहे. त्यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे.