महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्जतमधील पवार-शाह यांच्या सभेवर पावसाचे सावट - अहमदनगर विधानसभा निवडणूक 2019

सभेसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी अंथरण्यात आलेल्या चटयासुद्धा पाण्याखाली गेल्या आहेत. तर मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे.

पवार-शाह यांच्या सभेवर पावसाचे सावट

By

Published : Oct 19, 2019, 12:00 PM IST

अहमदनगर- राज्यात लक्षवेधी असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात आज राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले. त्यादृष्टीने आयोजकांनी सभेची जोरदार तयारीही केली आहे. मात्र, मध्यरात्रीपासूनच कर्जतसह नगर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे सभेच्या ठिकाणी पाणी साचले आहे.

पवार-शाह यांच्या सभेवर पावसाचे सावट

हेही वाचा -कर्जतमध्ये आज पवार-शाह आमने-सामने

सभेसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी अंथरण्यात आलेल्या चटयासुद्धा पाण्याखाली गेल्या आहेत. तर मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. दरम्यान, शरद पवार या सभेसाठी साडेअकरा वाजेपर्यंत येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. ढगाळ हवामानामुळे हवाई मार्गाने येणाऱ्या नेत्यांना अडचणी येण्याचा संभव आहे. मात्र, या दोन्ही सभा पार पडाव्यात, अशी उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details