Jaggery Chai : साखरेच्या पट्ट्यात..गुळाच्या चहाचा गोडवा - jaggery chai in ahmednagar
आता शहरातही गुळाचा चहा विकणारी वेगवेगळ्या ब्रँड अनेक चहाचे हॉटेल थाटली आहेत. साखरेचा चहा बनवणारे तसेच गुळाचा चहा विकणारे विक्रेते यांच्यात ग्राहक खेचण्यासाठी एक स्पर्धाच सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
गुळाचा चहा
अहमदनगर - अहमदनगर जिल्हा म्हटलं की साखरेचा आगार मानला जातो. या साखरेच्या पट्ट्यात मात्र गुळाच्या चहा चा गोडवा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. परिणामी साखरेच्या चहा पेक्षा गुळाचे चहाची चवच चांगली असते. अनेक चहा प्रेमी अर्थात शौकीन आपली तलफ भागविण्यासाठी गुळाच्या चहाला पसंती देताना दिसत आहे.
गुळाच्या चहाचे हॉटेल
आता शहरातही गुळाचा चहा विकणारी वेगवेगळ्या ब्रँड अनेक चहाचे हॉटेल थाटली आहेत. साखरेचा चहा बनवणारे तसेच गुळाचा चहा विकणारे विक्रेते यांच्यात ग्राहक खेचण्यासाठी एक स्पर्धाच सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. आमचाच चहाचा ब्रँड कसा भारी आहे. हे पटवून देण्यासाठी तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत आहे. गुळाचा चहा पिणाऱ्या शौकिनांनी आपल्या घरी महिलांना गुळाचा चहा बनवण्यास सांगितल्यास गुळाचा चहा बनवताना तो वारंवार फुटत असल्याने महिलांची मोठी पंचाईत होताना दिसत आहे. एवढे करूनही गुळाचा चहा घरी योग्य पद्धतीने व हाॅटेल सारखा बनला जात नसल्याने घरात मात्र गुळाच्या चहाच्या शौकीनांना नाईलाजास्तव साखरेच्या चहाला पसंती द्यावी लागत आहे.
Last Updated : Feb 14, 2022, 1:02 PM IST