अहमदनगर- जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी वसुबारस निमित्ताने गाईची सपत्नीक पूजा करून जिल्ह्यातील नागरिकांना, विशेषतः शेतकऱ्यांना दीपावली सणाच्या शुभेच्छा दिल्या. वर्षाचा महत्वाचा आणि जीवनाकडे तेजोमय वृत्तीने पहावयास लावणारा दीपावली प्रकाशाचा सण म्हणून साजरा होतो. या सणाची सुरुवात वसुबारसने होते. यानिमित्ताने गाईचे साग्रसंगीत पूजन करून गाईला नैवेद्य दिला जातो. जीवनात शांती आणि भरभराट येवो, अशी अपेक्षा या मागे असते. या निमित्ताने जिल्ह्यात नुकतेच रुजू झालेले जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सहकुटुंब आपल्या शासकीय निवस्थानी गाईचे सायंकाळच्या सुमारास पूजन केले.
डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी हेही वाचा - किरीट सोमैया गिधाडासारखा पेपर घेऊन फडफडतोय, ही त्यांना शेवटची वॉर्निंग - संजय राऊत
नगर हा कृषिप्रधान जिल्हा-
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील जनतेला विशेषकरून शेतकऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. हिंदू धर्मात गाईला देवतेचे महत्व आहे. शेतकऱ्यानं साठी गाई ही गो-माता म्हणून असलेली श्रद्धा आणि तिच्यावर असलेले प्रेम ही एक वेगळी ओळख असते. अहमदनगर जिल्हा हा कृषिप्रधान जिल्हा म्हणून परिचित आहे, त्या मुळे वसुबारस साजरी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांनी समाजाची सेवा केल्याची जाणीव त्यांनी व्यक्त करताना या संकटात शेतकऱ्यांनी आपला जीवधोक्यात घालून नागरिकांना दूध, धान्य, भाजीपाल्याचा अविरत पुरवठा केल्याचे सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी वसुबारस साजरी हेही वाचा -सहा वर्षीय मुलीचा हट्ट; आजोबा अन् वडिलांनी बनवली चक्क 'विंटेज मोटार'!
संकट कायम आहे, सावधान
दीपावली सण साजरा करताना यंदा कोरोनाचे संकट कायम असल्याची जाणीव जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी करून दिली. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्णसंख्या सध्या कमी-कमी होत आहे. हे जिल्हा आरोग्य यंत्रणेचे चांगल्या कामाचे यश असून नागरिकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाचा परिणाम असल्याचे सांगितले. मात्र अजूनही कोरोनाचे संकट पूर्णपणे टळले नसल्याचेही ते म्हणाले. दिवाळी सणानिमित्ताने बाजारात होणारी गर्दीकडे लक्ष वेधत खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर ठेवणे आणि सॅनिटायझरचा वारंवार वापर करणे हे नियम पाळणे गरजेचे असल्याचे सांगितले. कोरोनाची दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याने दीपावलीचा सण यंदा नियंत्रित पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.