शिर्डी(अहमदनगर) - साई मंदिर कलशारोहणाचा वर्धापन दिन आज डॉ. पारनेरकरांच्या पादुका पूजन व सुवर्ण कलशाच्या प्रतिमेच्या पूजनाने साजरा करण्यात आला. २९ सप्टेंबर १९५२ रोजी पूर्णवादाचे जनक डॉ रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या हस्ते साई मंदिरावर सुवर्ण कलशारोहण करण्यात आले होते. आज या घटनेला ६९ वर्षं झाली आहेत, साई मंदिराला यामुळे पूर्णत्व आले.
हेही वाचा -साईंची शिर्डी : कोरोनापूर्वी आणि नंतरची
- या वर्षीपासून कलशारोहण स्मृतिदिन साजरा होणार -
या सुवर्ण क्षणाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या वर्षीपासून कलशारोहण स्मृतिदिन साजरा करण्यात येणार आहे. यासाठी श्री पारनेरकर गुरुसेवा मंडळाचे अध्यक्ष गणेशदादा पारनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील नारायण जोशी व शिर्डीतील संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सुवर्णकलशाची प्रतिकृती बनवण्यात आली होती.