शिर्डी (अहमदनगर) Ram Mandir Pran Pratishtha Festival :येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्यात श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. या सोहळासाठी ज्या राम भक्तांना जाता येणार नाही असे भक्त आपल्या घरीच दिवाळी साजरी करणार आहेत. (Ram Temple in Ayodhya) याच अनुषंगाने शिर्डीतील फटाके व्यावसायिक रविंद्र गायके यांनी शिर्डीतील पिंपळवाडी रोडवर एक फटाका स्टॉल लावत 1 हजार फटाक्यांची लड, झाड स्पेशल 1 बॉक्स, भुईचक्र 1 बॉक्स, सुरसुरी बॉक्स, आयटम बॉम्ब 1 बॉक्स एवढे फटाके चक्क 499 रुपयात शिर्डीसह पंचक्रोषीतील श्रीराम भक्तांनासाठी उपलब्ध करून दिलेय. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्याला ज्या राम भक्तांना जाता येणार नाही अशा भक्तांनी आपल्या घरीच फटाके फोडून मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करावी यासाठी आम्ही राम भक्तांना अतिशय अल्प दरात फटाके उपलब्ध करून दिले असल्याचं फटाका स्टॉल मालक रविंद्र गायके यांनी सांगितलं आहे.
फटाका स्टॉल उद्घाटनाला या मान्यवरांची उपस्थिती:प्रभू श्रीराम मूर्तीची पूजा करत नारळ फोडून या फटाका स्टॉलचे आज उद्घाटन करण्यात आलेय. यावेळी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, भाजपा शहराध्यक्ष सचिन शिंदे, माजी नगरसेवक अशोक गोंदकर, सर्जेराव कोते, विश्व हिंदू परिषदेचे सुरेंद्र महाले, चेतन कोते यासह आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विविध धार्मिक विधी यज्ञ, होम हवन केले जातयं. 22 जानेवारीला होणाऱ्या या ऐतिहासीक धार्मिक कार्यासाठी आपला सहभाग असावा या भावनेतून अनेक जण आपआपले योगदान देत आहेत.