अहमदनगर -धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतःच्याच कार्यकर्त्यावर फसवणुकाचा case registered against Karuna Munde financial fraud case गुन्हा दाखल केला होता. मात्र या प्रकरणात वेगळेच बाब समोर आली आहे. त्यामुळे करुणा मुंडेंचे अस्त्र त्यांच्यावर उलटल्याची चर्चा आहे. नवीन पक्ष काढण्यासाठी रोख व सोन्याच्या स्वरुपात दिलेल्या सुमारे 34 लाख 45 हजार रुपयांची परतफेड न केल्याच्या फिर्यादीवरुन करुणा धनंजय मुंडे उर्फ करुणा अशोक शर्मा यांच्याविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
यापूर्वी करुणा मुंडे यांच्याविरोधात आहे गुन्हा दाखल विवाहित महिलेच्या पतीशी अनैतिक संबंध ठेवून तिच्या संसारात ढवळाढवळ करत महिलेला अश्लिल शिवीगाळ तसेच जातीवाचक शिवीगाळ केली. त्याशिवाय पतीकडून तिचा छळ केल्याच्या आरोपावरून करुणा मुंडे/शर्मा हिच्यासह दोघांवर पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये ( Yerawada Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 23 वर्षीय महिलेने पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार करुणा आणि महिलेचा पती यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.