महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपच्या माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधींवर गुन्हा दाखल, तीन कोटींच्या अपहाराचे आरोप - ex MP dilip gandhi news

नगर अर्बन बँकेची तीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी खासदार तथा बँकेचे माजी चेअरमन दिलीप गांधी यांसह तत्कालीन शाखाधिकारी घनशाम अच्युत बल्लाळ, कर्जदार आशुतोष सतिश लांडगे आणि इतर संचालक मंडळातील सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Dec 22, 2020, 7:32 PM IST

Updated : Dec 22, 2020, 8:38 PM IST

अहमदनगर- नगर अर्बन बँकेची 3 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे माजी खासदार तथा बँकेचे माजी चेअरमन दिलीप गांधी, तत्कालीन शाखाधिकारी घनशाम अच्युत बल्लाळ, कर्जदार आशुतोष सतिश लांडगे आणि इतर संचालक मंडळातील सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाखा अधिकाऱ्याने दिली तक्रार

याबाबतची तक्रार शाखाधिकारी मारूती रंगनाथ औटी (वय 45 वर्षे, रा. पाईपालाईन रोड, अहमदनगर) यांनी दिली. भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. अर्बन बँकेचे शाखाधिकारी मारूती औटी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, दिनांक 7 ऑक्टोबर, 2017 ते दिनांक 10 डिसेंबर, 2020 या दरम्यान बँकेचे माजी चेअरमन दिलीप मनसुखलाल गांधी (रा. देवेंद्र बंगला, आनंदऋषी मार्ग, अमहदनगर), मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी घनश्याम अच्युत बल्लाळ (रा. अर्बन बँक कॉलनी, शिलाविहार समोर, गणेश मंदीराशेजारी, सावेडी, अहमदनगर), कर्जदार मे. टेरासॉफ्ट टेक्नॉलॉजीचे आशुतोष सतिष लांडगे (रा. शिवानंद, वेदांतनगर, सावेडी, अहमदनगर) आणि संचालक मंडळ सदस्य यांनी बँकेला खोटे कागदपत्र तयार करुन बँकेच्या तीन कोटी रुपयांच्या रकमेचा अपहार केला. या 3 कोटी रूपयांची रक्कम आर. बी कासार, मे. देवी एजन्सी व मे. गिरीराल एंटरप्राइजेस, संगमनेर यांच्या खात्यात वर्ग करुन त्यांच्या खात्याद्वारे काढून घेवून बँकेच्या 3 कोटी रूपयांची फसवणूक केली आहे.

दिलीप गांधींनी केला चेअरमन पदाचा दुरुपयोग

संशयित आरोपींनी स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करुन खोटे कर्ज मंजूर केलेले आहे. त्याद्वारे बँकेच्या रकमेची चोरी, अफरातर व फसवणूक केली आहे. औटींच्या तक्रारीवरून 406, 420, 465, 467, 471 व 120 ब प्रमाणे सर्व आरोपींविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोजन महाजन हे करत आहेत.

हेही वाचा -जिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षकांना कामावर पुन्हा रुजू करा; जनआधार संघटनेचे उपोषण

हेही वाचा -सरकार शेतकऱ्यांना दिलेली आश्वासन पाळणार नसेल तर जगण्याची इच्छा नाही - अण्णा हजारे

Last Updated : Dec 22, 2020, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details