अहमदनगर- पक्षातील ज्या नेत्यांना उमेदवारी नकारण्यात आली आहे, त्याबाबत दिल्लीतील पार्लमेंट्री बोर्डाने विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे. उमेदवारी नाकरलेल्यांना पक्ष कदाचित नवीन जबाबदारी देणार असेल, अशी सारवासारव जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज महाजन यांच्या उपस्थितीत भरण्यात आला. यानंतर माध्यमांशी बोलताना महाजन यांनी पक्ष्यात सर्व आलबेल असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला. खडसे यांची नाराजी नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा-शिर्डीत विखे विरोधात थोरात तर, संगमनेरमध्ये थोरात विरोधात नवले लढत