अहमदनगर- माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या दुःखद निधनामुळे मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांची महाजनादेश यात्रा रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले संगमनेर राहुरी येथे येणार होती. मात्र अरुण जेटली यांचे निधन झाल्याने ही यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे समजते. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार आहे. 26 ऑगस्टला ही यात्रा पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांची राहुरी येथे होणारी महाजनादेश यात्रा रद्द.. - Mahamandesh Yatra ahamadnagar
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले संगमनेर राहुरी येथे येणार होती. मात्र माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन झाल्याने ही यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी दिल्लीला रवाना होणार आहेत. 26 ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधुन भाजपात आलेल्या मधुकर पिचड यांच्या बालेकिल्यात रविवारी ही महाजनादेश यात्रा पोहचणार होती. याठिकाणी सभा होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. वैभव पिचड आणि भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार होते. तसेच मुख्यमंत्री प्रथमच अकोले तालुक्यात येणार असल्याने दुपारी 12 वाजता आयटीआय मैदानावर जाहीर सभा होणार होती. शहरात विविध ठिकाणी स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांमध्ये शोककला पसरली आहे.