महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांचे साईदर्शनः मोदींच्या 'या' सल्ल्याचे केले काटेकोर पालन - राधा मोहन सिंह

माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि नवनिर्वाचित खासदार राधामोहन सिंह यांनी आज साई समाधीचे दर्शन घेतले. दुपारची साईची मध्यान आरतीही त्यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर त्यांचा साई संस्थानच्यावतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी मीडियाशी बोलण्यास मज्जाव केल्याने, त्यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिला.

राधामोहन सिंह

By

Published : May 26, 2019, 5:12 PM IST

अहमदनगर - माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि नवनिर्वाचित खासदार राधामोहन सिंह यांनी आज साई समाधीचे दर्शन घेतले. दुपारची साईची मध्यान आरतीही त्यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर त्यांचा साई संस्थानच्यावतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी मीडियाशी बोलण्यास मज्जाव केल्याने, त्यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिला.

साईंचे दर्शनाला जाताना खासदार राधामोहन सिंह...


खासदार राधामोहन सिंह यांनी शिर्डीमध्ये साई चरणी हजेरी लावली होती. मात्र, चर्चा रंगली ती मोदींनी दिलेल्या सल्ल्याची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियांशी बोलू नये, असा सल्ला एनडीएच्या पहिल्या बैठकीत दिला होता. त्याचे काटेकोरपणे पालन राधामोहन सिंह यांनी केल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी दर्शनानंतर पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला.


महत्वाचे म्हणजे, साई संस्थानच्यावतीने साई मंदिरात त्यांचे करण्यात येणारे चित्रकरणही त्यांनी करु दिले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details