शिर्डी ( अहमदनगर ) - शिर्डी शहरातील पानमळा परिसरात उभ्या असलेल्या तेलंगणातील बसने अचानक पेट घेतला ( Bus Burning In Shirdi ) आहे. यामुळे आकाशात धुराचे प्रचंड लोट उसळले होते. घटनेची माहिती मिळताच शिर्डी नगरपंचायत अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, बस पुर्णत: जळून खाक झाली आहे. आगीत कोणत्याही प्रकाराची हानी झाली नाही.
पानमळा परिसरात टि.एस. 12 यु.ए.7374 या वातानुकूलीत बसने अचानक पेट घेत भीषण आग लागली. यावेळी सुदाम गोंदकर यांनी शिर्डी नगरपंचायतच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाने आग विझविण्यासाठी आटोक्यात प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत बस पुर्णंत: जळून खाक झाली होती. बस जळल्यामुळे पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.