महाराष्ट्र

maharashtra

शिर्डी : मुळा नदीवरील साकूर-मांडवे पूल पाण्याखाली; पारनेर, संगमनेर तालुक्यांचा तुटला संपर्क

By

Published : Aug 4, 2019, 7:14 PM IST

संगमनेर तालुक्यातील मांडवे पूल पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुळा नदीवरील साकूर-मांडवे पूल पाण्याखाली

अहमदनगर- संगमनेर तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुळा पाणलोटात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. तसेच जोरदार पावसामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. तर मुळा नदीवरील साकूर-मांडवे पूल पाण्याखाली गेल्याने पारनेर आणि संगमनेर तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.

मुळा नदीवरील साकूर-मांडवे पूल पाण्याखाली

संगमनेर तालुक्यातील मांडवे पूल पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. साकूर-मांडवे पूल पाण्याखाली गेल्याने पारनेर आणि संगमनेर तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. कप पूल पाण्याखाली जाण्याची ही यावर्षी पहिलीच वेळ आहे. पुलाच्या दोन्ही बाजूने वाहतूक थांबवण्यात आली आहे. तसेच प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दुसरीकडे आढळा व म्हाळुंगी नद्यांनाही मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने देवठाण जवळील पूलावरून पाणी जात आहे. तर सिन्नर अकोले रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प आहे. दरम्यान, कासाराहून भंडारदरा धरणाकडे येणारा रस्ताही बंद आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details