अहमदनगर - गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी व तक्रारदाराच्या भावास 169 प्रमाणे गुन्ह्यातुन बाहेर काढण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनचा पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा याने हॉटेल चालकाच्या मदतीने फिर्यादीकडून तीस हजार रुपयांची लाच घेताना अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. यामध्ये हॉटेल चालकासह पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा यांच्या वर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -नंदुरबारमध्ये नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई
मध्यस्थामार्फत स्वीकारली तीस हजारांची लाच
जामखेड तालुक्यातील शिऊर येथील तक्रारदार यांच्या भावास जामखेड गु.र.नं 698/2020 या गुन्ह्यात अटक करून पोलीस कस्टडी रीमांड घेतली आहे. यानंतर गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी व तक्रारदार यांच्या भावास 169 प्रमाणे गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पन्नास हजार रुपयांची मागणी जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा याने केली होती. यानंतर तडजोडीअंती तीस हजार रुपये देण्याचे ठरले. तसेच हे पैसे तुकाराम ढोले याच्या कडे हॉटेल कृष्णा येथे देण्यास सांगितले. मात्र फिर्यादीने पैसे देण्याच्या आगोदर अहमदनगर येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाने जामखेड पोलीस स्टेशनला येऊन लाचे बाबत खात्री करून घेतली त्यानुसार लाचेची मागणी करण्यात आली आसल्याचे निष्पन्न झाले.