महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Akshay Kumar In Shirdi : बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार साईचरणी नतमस्तक; चाहत्यांची मोठी गर्दी - Huge Crowd of Fans to Watch

शिर्डी साईबाबांचे परमभक्त तसेच सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. आज बुधवारी साईबाबांच्या माध्यन्ह आरतीनंतर अक्षयकुमार यांनी साईबाबा मंदिरात येऊन समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.

Bollywood Actor Akshay Kumar Visit to Sai Temple; Huge Crowd of Fans to Watch
बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार साईचरणी नतमस्तक; चाहत्यांची मोठी गर्दी

By

Published : Jan 25, 2023, 3:27 PM IST

अहमदनगर/शिर्डी : साईबाबांच्या समाधीच्या दर्शनानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी अक्षयकुमारचा साईमूर्ती तसेच शाल देऊन सन्मान केला. साई मंदिराबाहेर आल्यानंतर मंदिर परिसरात चाहत्यांनी अक्षयला बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी हस्तांदोलन करताना पडलेल्या भाविकांची अक्षयकडून विचारपूस करण्यात आली.

चाहत्यांची सकाळपासूनच अक्षयला बघण्यासाठी गर्दी :अभिनेता अक्षयकुमार आज साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असल्याची माहिती चाहत्यांना समजल्यानंतर चाहत्यांनी सकाळपासूनच अक्षयला बघण्यासाठी मंदिराबाहेरील व्हीआयपी गेटवर मोठी गर्दी केली होती. यावेळी अक्षयकुमार याने प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे.

काही महिन्यांपूर्वी अनंत अंबानी यांची साईबाबा संस्थानला भेट :प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी दीपावली निमित्ताने शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी अनंत अंबानी यांनी साईबाबा संस्थानला 1 कोटी 51 लाख रुपायांची देणगी दिली, असल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्याश्री बानायत यांनी दिली.

साईबाबांच्या चरणी दान : शिर्डी साईबाबांचे परमभक्त असलेले अंबानी कुटुंबीय नेहमी साईबाबांच्या चरणी मोठे दान देतात. दीपावली निमित्ताने अनंत अंबानी यांनी शिर्डीत येत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी साईबाबांची 'शिर्डी माझे पंढरपूर' ही छोटी आरती करीत पाद्यपूजा केली. साईबाबांच्या दर्शनानंतर साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्याश्री बानायत यांनी अनंत अंबानी यांचा साई शॉल व साई मूर्ती देऊन सत्कार केला होता.

साई संस्थानकडून आता कठोर पावले उचलली जाताहेत :काही तथाकथित पी. ए. भाविकाकंडून मोठी माया घेत असल्याच्या तक्रारी संस्थानला प्राप्त झाल्या आहेत. अशा तक्रारी प्राप्त होताच साईसंस्थानचा कारभार पाहणाऱ्या तदर्थ समितीने कठोर पाऊले उचलली आहेत. ज्यानुसार यापुढे आजी माजी मंत्री, आमदार, खासदार, विश्वस्त यांना स्विय सहाय्यकाचे अधिकृत पत्र साईबाबा संस्थानला द्यावे लागणार आहे. तसेच व्हीआयपी व्यक्तींना किमान एक दिवस आधी शिर्डीला येण्याबाबतची सुचना संस्थानला द्यावी लागणार असल्याचे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव यांनी स्पष्ट केले आहे. साई संस्थान सेवेतील काही कर्मचारी आणि अधिकारी देखिल अशा प्रकारच्या गैर प्रकारात सहभागी असल्याच्या तक्रारी तदर्थ समितीला प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकारात कर्मचारी अधिकारी सहभागी असल्याच निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार असून तसे परिपत्रकदेखील संस्थानच्या वतीने काढण्यात आल्याची माहिती राहुल जाधव यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details