महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीत येत्या मंगळवारी रत्तदान शिबिराचे आयोजन, जास्तीत जास्त सहभागाचे नागरिकांना आवाहन - Ahmednagar District Latest News

शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीने येत्या 24 नोव्हेंबर साई आश्रमात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात जस्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी केले आहे.

Blood donation camp to be held in Shirdi
शिर्डीत रक्तदान शिबिराचे आयोजन

By

Published : Nov 20, 2020, 3:20 PM IST

शिर्डी (अहमदनगर) -शिर्डी साईबाबा संस्थानच्यावतीने येत्या 24 नोव्हेंबर साई आश्रमात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात जस्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी केले आहे.

कोरोनाने जगभरात थैमान घातले होते. आता हळूहळू कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होत आहे. मात्र अनेक रुग्णांना शस्त्रक्रिया व अन्य कारणांसाठी रक्ताची गरज भासत आहे. रुग्णांची रक्ताची गरज लक्षात घेऊन, येत्या 24 तारखेला साई संस्थानाकडून साई आश्रमातील शताब्दी सभामंडपात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन, रक्तदान करण्याचे आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे. साईबाबा संस्‍थानची श्री साईनाथ रक्‍तपेढी ही महाराष्‍ट्रातील नामांकीत रक्‍तपेढी असून, अहमदनगर जिल्‍ह्यातील जवळपास निम्म्‍याहून अधिक रक्‍तपुरवठा या रक्‍तपेढीमार्फत करण्‍यात येतो. सध्‍याच्‍या स्थितीला साईनाथ रक्‍तपेढीमध्‍ये पुरेसा रक्‍तसाठा उपलब्‍ध नाही. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, रक्तपुरवठ्याची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या 24 तारखेला सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत साई आश्रमामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details