शिर्डी- कोरोना प्रतिबंधात्मक लस ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या कोल्ड चैनचा खर्च अतिशय मोठा आहे. मात्र, आपल्याकडे परमिटरुम सोडले तर कोल्ड चैन नाही. त्यामुळे परमिटरुममध्ये बाटल्यांऐवजी इंजेक्शन ठेवण्याची वेळ आली असती, अशा शब्दात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारी यंत्रणेवर उपरोधिक टीका केली आहे. मात्र दुसरीकडे त्यांनी भारतातील तीन कंपन्यांनी कोरोनाची प्रतिबंधात्मक लस निर्माण करुन जगासमोर एक आदर्श ठेवला असल्याचेही मत व्यक्त केले आहे.
परमिटरुममध्ये बाटल्यांऐवजी इंजेक्शन ठेवण्याची वेळ - विखे पाटील - परमिट रुम मध्ये कोरोना लस
कोरोना काळात अनेक खासगी रुग्णालयांनी गरिबांना लुटण्याचे काम केले आहे, अशा लोकांची शासनाने चौकशी करावी. आपल्याकडे अनेक खासगी हॉस्पीटलची यादी आहे. ज्यांनी कोरोना काळात पेशंटला लुटले असल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले.
खासगी रुग्णालयांची चौकशी करा-
कोरोना काळात अनेक खासगी रुग्णालयांनी गरिबांना लुटण्याचे काम केले आहे, अशा लोकांची शासनाने चौकशी करावी. आपल्याकडे अनेक खासगी हॉस्पीटलची यादी आहे. ज्यांनी कोरोना काळात पेशंटला लुटले असल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले. ते शिर्डीत आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी विखे पाटील यांच्या हस्ते शिर्डीतील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.
विखे पुढे म्हणाले, भारत हा एकमेव देश आहे, ज्याने कोरोना विषाणूवरील प्रतिबंधात्मक लस जगाला पुरवण्याचा निर्णय घेतला. आज अनेक महासत्ता असलेले देश पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आशेने पाहत आहेत, की भारत आम्हालादेखील कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा करेल.