महाराष्ट्र

maharashtra

अतिक्रमण करुन इमारती बांधल्याने शिर्डी शहराची ही अवस्था - राधाकृष्ण विखे-पाटील

By

Published : Sep 20, 2020, 3:45 PM IST

Updated : Sep 20, 2020, 4:48 PM IST

यावर्षी मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली असल्याने त्यामुळे शेतातील विहीर, तलाव पूर्ण क्षमतेने भरून पावसाचा प्रत्येक थेंब पाण्याबरोबर वाहत येऊन हे पाणी शिर्डी शहरात येऊन पोहोचले आहे. यावेळी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिर्डी शहरात जुन्या लेंडीनाल्याला आलेल्या पुरामुळे श्रीरामनगर, पुनमनगर, हेडगेवारनगरमध्ये जाऊन पाहणी करत येथील रहिवाशांचे प्रश्न जाणून घेतले.

bjp leader radhakrushna vikhe patil on shirdi water problem
अतिक्रमण करुन इमारती बांधल्याने शिर्डी शहराची ही परिस्थिती

शिर्डी (अहमदनगर) -शिर्डी परिसरातील कोर्हाळे-डोर्हाळे या गावांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे गावातील बंधारे ओसंडून वाहत असून या बंधाऱ्याचे पाणी शिर्डी शहराच्या पश्चिम भागातील श्रीरामनगर, साईच्छानगर, हेडगेवारनगर तसेच संस्थानचा साईनाथ रुग्णलायत शिरले असल्याने राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पूर परिस्थितीची पाहणी करुन शिर्डी नगरपंचायत प्रशासनाला सदरील पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी तातडीने सुचना केले आहे.

अतिक्रमण करुन इमारती बांधल्याने शिर्डी शहराची ही अवस्था
राहाता तसेच कोपरगाव तालुक्यातील काकडी, कोऱ्हाळे दुष्काळी भागात अनेक वर्षांपासून समाधानकारक पाऊस पडला नव्हता. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली असल्याने त्यामुळे शेतातील विहीर, तलाव पुर्ण क्षमतेने भरून पावसाचा प्रत्येक थेंब पाण्याबरोबर वाहत येऊन सदरचे पाणी शिर्डी शहरात येऊन पोहोचले आहे. ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांनी जुन्या नाल्यांवर अतिक्रमण केले असून जुन्या काळात पाणी जाण्यासाठी शिर्डी शहरांमध्ये पाटबंधारे विभागाच्या चाऱ्या तसेच लेंडी नाल्यावर साईबाबा संस्थांनने आणि काही ग्रामस्थांनी अतिक्रमण करुन इमारती बांधल्या आहे त्यामुळे सदरचे पाणी मार्ग प्रवाह मिळेल त्या जागी शिरकाव करत आहे. यावेळी विखे पाटील यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी याप्रश्नी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आदेश दिले. तसेच तालुक्यातील इतर नगरपंचायतकडे पाणी काढण्यासाठी असलेले पंप वापरुन शहरातील पाणी बाहेर काढावेत, असे सुतोवाच केले.
अतिक्रमण करुन इमारती बांधल्याने शिर्डी शहराची ही परिस्थिती
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिर्डी शहरात जुन्या लेंडीनाल्याला आलेल्या पुरामुळे श्रीरामनगर, पुनमनगर, हेडगेवारनगरमध्ये जाऊन पहाणी करत येथील रहिवाशांचे प्रश्न जाणून घेतले. यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार कुंदन हिरे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, नगराध्यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते, संस्थानचे बांधकाम विभाग खातेप्रमुख रघुनाथ आहेर, आदीसह नगरपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.
अतिक्रमण करुन इमारती बांधल्याने शिर्डी शहराची ही परिस्थिती
Last Updated : Sep 20, 2020, 4:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details