अहमदनगर -राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भाजपाकडून आर्थिक घोटाळ्याचे आरोप होत आहेत. तसेच काही मंत्री व त्यांच्या कुटुंबीयांची आयकर विभाग, ईडी आदी संस्थांकडून चौकशी होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्र्यांसंदर्भात गौप्यस्फोट केला आहे. आयकर विभागाने 1 हजार 50 कोटी रुपयांच्या समोर आणलेल्या घोटाळ्यात राज्यासह अहमदनगर जिल्ह्यातील ‘कोणाला लक्ष्मी प्रसन्न झाली आणि कोणाचे हात सोन्याने पिवळे झाले हे लवकरच समोर येईल, असे सूचक विधान करुन महाविकास आघाडीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी निशाणा साधला आहे.
राज्यातील विविध नेत्यांवर होत असलेल्या भष्ट्राचाराच्या कारवाईनंतर विखे पाटलांचे सूचक विधान, म्हणाले... - विखे पाटलांची महाविकास आघाडी सरकारवर टीका
मागील आठवड्यात आयकर विभागाने समोर आणलेल्या घोटाळ्यात अधिकारी, दलाल आणि काही मंत्र्यांची नावे असल्याची आपली माहीती आहे. त्यामुळे या घोटाळ्यात कोणाला लक्ष्मी प्रसन्न झाली आणि कोणाचे हात सोन्याने पिवळे झाले, हे समोर येईलच परंतु हे रॅकेट उघड झाल्यास जिल्ह्यातील काहींची नावे पुढे आली तर आश्चर्य वाटायचे कारण नाही, असेही पाटील म्हणाले.
भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या सरकारचा रिमोट कंन्ट्रोलही आता दुसऱ्यांच्या ताब्यात गेल्याने मुख्यमंत्री हतबल झाल्याची घणाघाती टिका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. सत्तेत आल्यापासुनच महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकत चालले आहे. या घोटाळ्यांवरुन जनतेचे लक्ष विचलित करुन, केवळ दिशाभुल करण्याचे काम मंत्र्याकडून सुरु असून, कालचा महाविकास आघाडीचा बंद हा त्याचसाठी होता. परंतु राज्यातील सुज्ञ जनतेने या महाराष्ट्र बंदला कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचा दावा विखे पाटील यांनी केला आहे. मागील आठवड्यात आयकर विभागाने समोर आणलेल्या घोटाळ्यात अधिकारी, दलाल आणि काही मंत्र्यांची नावे असल्याची आपली माहीती आहे. त्यामुळे या घोटाळ्यात कोणाला लक्ष्मी प्रसन्न झाली आणि कोणाचे हात सोन्याने पिवळे झाले, हे समोर येईलच परंतु हे रॅकेट उघड झाल्यास जिल्ह्यातील काहींची नावे पुढे आली तर आश्चर्य वाटायचे कारण नाही, असेही पाटील म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराची मालिकाच समोर आली आहे. राज्याच्या इतिहासात गृहमंत्री फरार झाल्याची घटना प्रथमच घडली आहे. यावरूनच या सरकारचा कारभार जनतेच्या हिताचा आता राहिला नसल्याची टीका विखे पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा -अनिल देशमुख प्रकरण : सीबीआयकडून सीताराम कुंटे, संजय पांडेंना समन्स