शिर्डी (अहमदनगर) - विरोधी पक्षनेते पद संविधानिक पद आहे. या पदावर असलेल्या व्यक्तिबाबत शिवसेनेच्या आमदाराने गलिच्छ वक्तव्य करून स्वतःच्या पक्षाचीच प्रतिमा मलीन केली आहे. पक्षप्रमुखाने त्या आमदारावर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.
आमदार गायकवाड यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न
विखे पाटील यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी त्यांना तातडीने समज देण्याची गरज होती. महाविकास आघाडी सरकामधील नेते नैतिकतेच्या गप्पा मारून केंद्रावर टीका करतात. मात्र, विरोधी पक्षनेत्यांवर गलिच्छ भाषेत टीका करणाऱ्या आमदाराला पाठीशी घालण्याचे काम करतात, असा आरोपही राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.