महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'राज्यात दारूच्या दुकानांसह सगळेच उद्योग सुरू, मुख्यमंत्र्यांकडून 'हरी' मात्र लॉक' - अहमदनगर इंदुरीकर महाराज बातमी

काही मुठभर लोकांनी कायद्याची पळवाट शोधत त्यांच्याविरोधात संगमनेर सत्र न्यायलयात फिर्याद दाखल केली आहे. महाराष्ट्रातील अध्यात्मातील सर्व मंडळी महाराजांच्या पाठिशी आहे. शिवसेना हिंदुत्ववादी होती, या चार-सहा महिन्यात शिवसेनेचे हिंदूत्व कुठे दिसते असा सवाल भाजपच्या अध्यात्मिक सेलचे सहसंयोजक तुषार भोसले यांनी केला. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे हे शरद पवार यांना सोडून इतर कुणालाही भेटायलाही तयार होत नाहीत.

bjp leader meet indorikar maharaj at ahmednagar
'राज्यात दारूच्या दुकानांसह सगळेच उद्योग सुरू, 'हरी' मात्र लॉक'

By

Published : Jul 13, 2020, 8:37 AM IST

Updated : Jul 13, 2020, 9:23 AM IST

शिर्डी (अहमदनगर) -समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची मनसे पाठोपाठ आता भाजप नेत्यांनी भेट घेतली आहे. आज भाजपच्या अध्यात्मिक सेलचे सहसंयोजक तुषार भोसले यांनी इंदोरीकर महाराज यांच्या ओझर येथील निवासस्थानी भेट घेत चर्चा केली आहे.

'राज्यात दारूच्या दुकानांसह सगळेच उद्योग सुरू, मुख्यमंत्र्यांकडून 'हरी' मात्र लॉक'
इंदोरीकर महाराजांनी वारकरी संप्रदायाची पताका खेड्यापाड्यात पोहोचवली असून त्यांनी आपल्या कीर्तनात ग्रंथाच्या अधारे वक्तव्य केले. या प्रकरणी इंदोरीकर महाराजांनी माफी मागितल्यानंतर हा विषय संपायला हवा होता. मात्र, काही मुठभर लोकांनी कायद्याची पळवाट शोधत त्यांच्याविरोधात संगमनेर सत्र न्यायलयात फिर्याद दाखल केली आहे. महाराष्ट्रातील अध्यात्मातील सर्व मंडळी महाराजांच्या पाठिशी आहे. शिवसेना हिंदुत्ववादी होती, या चार-सहा महिन्यात शिवसेनेचे हिंदूत्व कुठे दिसते असा सवाल भाजपच्या अध्यात्मिक सेलचे सहसंयोजक तुषार भोसले यांनी केला. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे हे शरद पवार यांना सोडून इतर कुणालाही भेटायलाही तयार होत नाहीत. त्यामुळे आमच्या अडचणी राज्यपालांकडे मांडल्या आहेत. पुनश्च हरि ओमच्या नावाखाली दारूच्या दुकानांसह सगळेच उद्योग सुरू केले. हरीला मात्र लॉक करुन ठेवले आहे, अशी टीका आचार्य तुषार भोसले यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेवर केली.मनसे नेते अभिजीत पानसे यांनी देखील इंदोरीकर महाराजांची काल (रविवार) भेट घेतली होती. समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असं वक्तव्य केल्याने इंदोरीकर महाराज अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात संगमनेर सत्र न्यायालयात खटला सुरू असताना आज भाजप नेत्याने भेट घेऊन इंदोरीकर महाराजांशी चर्चा केली.
Last Updated : Jul 13, 2020, 9:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details