महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...मात्र, मतदान अकोल्याचीच जनता करणार, मधुकर पिचडांचा प्रथमच शरद पवारांवर हल्ला - मुधकर पिचडांचा शरद पवारांवर हल्लाबोल

बारामतीवरुन अकोल्यात लोक पाठवली गेली आहेत. मात्र, मतदान तर अकोल्याची जनताच करेल, अशा शब्दात भाजप नेते मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्यावर पहिल्यांदाच पवारांवर टीका केली आहे.

भाजप नेते मधुकर पिचड अकोले येथील सभेत बोलताना.

By

Published : Oct 20, 2019, 12:06 PM IST

Updated : Oct 20, 2019, 2:20 PM IST

अहमदनगर - बारामतीवरुन अकोल्यात लोक पाठवली गेली आहेत. मात्र, मतदान तर अकोल्याची जनताच करेल, अशा शब्दात भाजप नेते मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्यावर पहिल्यांदाच पवारांवर टीका केली आहे. ते अकोल्यात त्यांचे पुत्र आणि भाजप उमेदवार वैभव पिचड यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत बोलत होते.

भाजप नेते मधुकर पिचड अकोले येथील सभेत बोलताना.

हेही वाचा -राज्यभरात प्रचाराच्या तोफा थंडावल्या.. आता प्रतीक्षा मतदानाची

दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदार संघात प्रचाराची सांगता संगमनेर शहरात जोरदार रॅली काढण्यात आली. या रॅलीत हजारो युवक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. ढोल ताशांचा गजर, महिला कार्यकर्त्यांनी बांधलेले मराठमोळे फेटे, ठिकठिकाणी औक्षण आणि संगीताच्या निनादात तरुणाईने धरलेला ठेका हे लक्ष वेधून घेत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. कोपरगावात राष्ट्रवादीचा उमेदवार यांच्या सांगता सभेसाठी शहरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली होती.

Last Updated : Oct 20, 2019, 2:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details