अहमदनगर -राज्यात सध्या लोडशेडिंग सुरु आहे त्याला केवळ दोन मंत्र्यांनीमधील भांडण नियोजनाचा अभाव आणि भ्रष्टाचारी प्रशासन कारणीभूत आहे. केद्र सरकारने तिनदा पत्र देवूनही महाविकास आघाडी सरकारने कोळसा स्टॉक केला नाही. सरकारचा कँश फ्लोही बिघडला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला लोडशेडिंगच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या सरकारने चांगले काम केले तर एका दिवसात महाराष्ट्र लोडशेडिंग ( Maharashtra loadshedding ) मुक्त होवू शकते, असा विश्वास माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Former Energy Minister Chandrasekhar Bawankule ) यांनी व्यक्त केला आहे.
BJP Leader Chandrasekhar Bawankule :'...तर एका दिवसात लोडशेडिंगचे संकट टळू शकते' - एका दिवसात लोडशेडिंगचे संकट टळू शकते
सरकारचा कँश फ्लोही बिघडला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला लोडशेडिंगच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या सरकारने चांगले काम केले तर एका दिवसात महाराष्ट्र लोडशेडिंग ( Maharashtra loadshedding ) मुक्त होवू शकते, असा विश्वास माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे ( Former Energy Minister Chandrasekhar Bawankule ) यांनी व्यक्त केला आहे.
साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, जर मला कधी शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणाले असते की तुमच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करायची आहे. तर मी त्यांची मंडप टाकून जेवणाची आणि टाळ मुरुदंगाची व्यवस्था केली असती, असेही बावनकुळे म्हणाले. राणांना जर उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा करायची होती तर ठाकरेंनी मोठे मन दाखवून राणांना परवानगी द्याला हवी होती. आपल्या घरासमोर हनुमान चालीसा करण्याची परवानगी देवून त्यांची सगळी व्यवसाथ केली असती तर राज्यात ऐवढा मोठा गोंधळ उडाला नसता, असेही यावेळी बावनकुळे म्हणाले आहे.
हेही वाचा -Rana Attempt's For Bail : राणा दाम्पत्याला दिलासा नाहीच, आता शुक्रवारी सुनावणी
TAGGED:
Maharashtra loadshedding