शिर्डी (अहमदनगर) - जलयुक्त शिवार योजनेतुन फायदा झाल्याचे शेतकरीही सांगत होते. त्यामुळे सत्य हे सत्यच असत ते कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तर झाकले जात नाही. अजुन ऐवढीही बेबंदशाही आली नाही, असे विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. जलयुक्त शिवार योजनेला मिळालेल्या क्लीनचिटवरुन ते बोलत होते. त्यांनी एका भूमिपूजन कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला.
केवळ राजकारण म्हणून जलयुक्त शिवार योजनेची चौकशी लावली - चंद्रकांत पाटील
जलयुक्त शिवार योजनेचा फायदाच झाला. केवळ राजकारणाचा भाग म्हणून जलयुक्त शिवार योजनेची चौकशी लावली गेली. त्यामुळे दुध का दुध पाणी का पाणी झाल आहे. समीर वानखेडेवर नवाब मलिक आरोप करत आहे. त्याचेही दुध का दुध पाणी का पाणी होणार असल्याचही चंद्रकात पाटलांनी म्हटले आहे.
जलयुक्त शिवार योजनेचा फायदाच झाला. केवळ राजकारणाचा भाग म्हणून जलयुक्त शिवार योजनेची चौकशी लावली गेली. त्यामुळे दुध का दुध पाणी का पाणी झाल आहे. समीर वानखेडेवर नवाब मलिक आरोप करत आहे. त्याचेही दुध का दुध पाणी का पाणी होणार असल्याचही चंद्रकात पाटलांनी म्हटले आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना खस्ता खावून लिहिली. ती घटनाच यांना मान्य नाही आहे. ज्याप्रकारे ड्रग्जच समर्थन चालल आहे. त्या पार्टीत सापडलेल्यांची वकीली करण चालले आहे. हे सामान्य माणसाला कळते, असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.
हेही वाचा -'जलयुक्त शिवार'ला क्लीनचिट नाही, देवेंद्र फडणवीस यांच्या अ़डचणी वाढणार