अहमदनगर - सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळायला लागेल की सरकार निर्यात बंदी आणि कांदा साठवणुकीला मर्यादा आणण्यासारखे निर्णय घेते. या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांच्या संसाराची होळी करत असल्याची घणाघाती टीका पवारांनी केली. पवार राहुरी येथील प्रचार सभेत बोलत होते.
भाजप सरकार शेतकऱ्यांच्या संसाराची होळी करतयं - शरद पवार हेही वाचा -बाळा..मी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे, पवारांची मुख्यमंत्र्यांना मार्मिक समज
राहुरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचार सभेसाठी पवार राहुरीत आले होते. यावेळी भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डीलेंना आम्ही चुकुन साथ दिली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी केलेल्या कारनाम्यामुळे अर्थात त्यांच्यावर असलेल्या विविध गुन्ह्यांमुळे राजकारणातील अशा गुंडगिरीला संपविण्यासाठी आम्ही त्यांची साथ सोडली असल्याचे स्पष्ट करत पवारांनी कर्डीलेंच्या गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थीत केला.
हेही वाचा -सरकारच्या अयोग्य धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या -शरद पवार
राज्यातील अनेक उद्योग धंदे आता बंद पडत आहेत. सुखोई विमान बनविणाऱ्या एचएएल कंपनीच्या कामगारांच्या नोकऱ्या जाणार असल्याने त्यांनी आता आंदोलन सुरु केले आहे. या सरकारने काय केले? आपले वाटोळे करायला या सरकारला मतदान करायचे का? असा सवाल पवारांनी यावेळी केला.