अहमदनगर - जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजप उमेदवार राम शिंदे यांच्या समोर राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. राज्यातील लक्षवेधी लढत असलेल्या या मतदारसंघात निवडुकाजवळ येत आहेत तसा प्रचाराचा ज्वर वाढला आहे. अशावेळी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही उमेदवारांची धावपळ होत आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात राम शिंदेंची प्रचारासाठी 'घोडदौड'
जामखेड शहरात एका प्रभागात ते प्रचाराला गेले असताना तेथील उत्साही कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी त्यांना चक्क घोड्यावर बसवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. यावेळी शिंदेंनी पण नागरिकांचा आग्रह न मोडता मोठ्या दिमाखात घोड्यावर बसून मतदारांना अभिवादन करत प्रभागात घोडेस्वारी केली.
हेही वाचा -'मित्रपक्षांचा भाजपने वापर केला, आता फेकून द्यायचे काम केले सुरू'
खुद्द शरद पवारांचे नातु रोहित आणि राम शिंदे यांच्यात ही सरळ लढत होत असल्याने शिंदेंनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. जामखेड शहरात एका प्रभागात ते प्रचाराला गेले असताना तेथील उत्साही कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी त्यांना चक्क घोड्यावर बसवून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. यावेळी शिंदेंनी पण नागरिकांचा आग्रह न मोडता मोठ्या दिमाखात घोड्यावर बसून मतदारांना अभिवादन करत प्रभागात घोडेस्वारी केली. या घोडेस्वारीचा व्हिडीओ सध्या मतदारसंघात चांगलाच व्हायरल होत आहे.