अहमदनगर -छत्रपती उदयनराजे भोसलेंना शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितल्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी वातावरण तापले आहे. याचे पडसाद अहमदनगर येथेही पहायला मिळाले. गुरुवारी शहर भाजपच्या वतीने राऊत यांच्या फोटोला 'जोडे मारो' आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. संजय राऊतांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी समज देऊन कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.
राऊत यांनी बुधवारी पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये 'माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा,' असे वक्तव्य केले होते. तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या गँगस्टर करीम लाला याला भेटत असत, असेही त्यांनी वक्तव्य केले होते.