अहमदनगर - कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानला अनोख्या स्वरुपात देणगी देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या तापाची तपासणी करण्यासाठी साई संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे यांनी तब्बल ११ डिजिटल नॉन कॉन्टेक्ट थर्मामीटर संस्थानला देणगी स्वरुपात दिले आहे. या देणगीचे मोठे कौतुक होत आहे.
कोरोना: भाविकांच्या सुरक्षिततेसाठी साई संस्थानला एक अनोखी देणगी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानला देणगी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानला अनोख्या स्वरुपात देणगी देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या तापाची तपासणी करण्यासाठी साई संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे यांनी तब्बल ११ डिजिटल नॉन कॉन्टेक्ट थर्मामीटर संस्थानला देणगी स्वरुपात दिले आहे.
'सबका मालिक एक'चा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारों भाविक शिर्डीत येतात. आज जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असल्याने या भाविकांच्या सुरक्षेतेसाठी साई संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे यांनी ११ डिजिटल नॉन कॉन्टेक्ट थर्मामीटर साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडे देणगी स्वरुपात सुपूर्त केले. या ११ डिजिटल नॉन कॉन्टेक्ट थर्मामीटरचा संस्थानने आजपासून वापर सुरु केला. दर्शनरांगेतून साईसमाधीच्या दर्शनाकरीता जाणाऱ्या साईभक्तांची तापाची तपासणी केली जात आहे. अजुन डिजिटल नॉन कॉन्टेक्ट थर्मामीटरची गरज साई संस्थानला भासल्यास अजुन देण्याची तयारी साई संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हेंनी दाखवली आहे.