शिर्डी (अहमदनगर) - देश विदेशातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता मोठी विमाने देखील उतरू शकणार आहेत. एमएडीसीने शिर्डी विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार केला आहे. त्यामुळे येथे आता मोठी विमाने देखील उतरू शकणार असल्याची माहिती एमएडीसीचे उपाध्यक्ष दीपक कपूर यांनी दिली आहे.
विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढवली -
शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्रीच्या वेळी विमाने उतरण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. एमएडीसीचे उपाध्यक्ष दीपक कपूर यांनी याबाबत माहिती दिली आहे. आधी या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची लांबी २५०० मीटर होती. आता ती ३२०० मीटर इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे बोईंग, एअरबससारख्या मोठ्या विमानांचेही लँडिंग होऊ शकणार आहे. त्यासाठी ४१ कोटी रुपये खर्च करण्यात आला असल्याची माहिती दीपक कपूर यांनी दिली आहे.