महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्रातील सर्वात मोठे आयसीयू रुग्णालय लोणीत उभारणार, 13 एप्रिलला होणार भूमीपूजन

राहाता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा मेडीकल ट्रस्ट व प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने लोणी येथे राज्यातील सर्वात मोठे आयसीयू रुग्णालय ( ICU Hospital ) उभारण्यात येणार आहे, अशी माहिती प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी दिली आहे.

डॉ राजेंद्र विखे पाटील
डॉ राजेंद्र विखे पाटील

By

Published : Apr 10, 2022, 3:07 PM IST

राहाता ( अहमदनगर ) - तालुक्यातील लोणी येथील प्रवरा मेडीकल ट्रस्ट व प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने लोणी येथे राज्यातील सर्वात मोठे आयसीयू रुग्णालय ( ICU Hospital ) उभारण्यात येणार आहे, अशी माहिती प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी दिली आहे.

बोलताना डॉ राजेंद्र विखे पाटील

बुधवार दिनांक 13 एप्रिल, 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता डॉ. बाळासाहेब विखे पाटील लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठया आय.सी.यु. सेंटरच्या भूमीपूजन कोनशिलेचे अनावरण व व्हेंटिलेटरचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. प्रवरा मेडीकल ट्रस्टने कोव्हिड आपत्तीच्या काळात सात हजार रुग्णांवर अल्पदरात सेवा दिली. तीस हजार पेक्षा जास्त नागरीकांचे लसीकरण तसेच चाळीस हजार कोरोना चाचण्या एका छताखाली करत आपल्या सर्वाच्या सहकार्यामुळे शंभर बेडचे देशातील पहिले डेडिकेटेड कोरोना रुग्णालय ( Dedicated Covid Hospital ) सहा दिवसांत उभारुन हे सर्व कार्य करू शकलो. या काळात नागरीकांनी ही प्रवरा मेडीकल ट्रस्टला डोनेशन रुपात भरीव मदत केली आहे. या काळात आपण केलेल्या संयुक्त प्रयत्नांमुळे कोविड रुग्णांचा मृत्यूदर हा देशातील सर्वात कमी राहिला असल्याच यावेळी बोलताना डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी सांगितले आहे.

कोविड महामारीच्या काळात अहमदनगर जिल्ह्यात नव्हे तर राज्यांतही आय.सी.यु.ची मोठी कमतरता असल्याचे आपल्या निदर्शनास आले आहे म्हणून आपण 100 कोटी रुपये गुंतवणूक करुन 365 बेड्सचे डेडीकेटेड आय.सी.यु.सेंटर उभारत आहोत. यातील 100 व्हेंटीलेटरचा लोर्कापण सोहळा व नविन आय.सी.यु सेंटरच्या भूमीपुजन कोनशिलेचे अनावरण इस्कॉन संस्थेचे संचालक, गोवर्धन इकोव्हिलेजचे गौरंगदास प्रभु तसेच गुगल इंडियाचे हेल्थ केअर विभाग प्रमुख गुलजार आझाद, ट्रान्सट्रेडिया युनिर्व्हसिटीचे चेअरमन उदित शेठ, पार्टनर फॉर सेंटर फॉर रिसर्च अॅण्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट हितेश त्रिवेदी, गोवर्धन इकोव्हिलेजचे सोशल इनिशिटिव्ह प्रमुख यचनित पुष्कर्णा, राज्यपालांचे विशेष कार्यकारी अधिकारी, राकेश नैथानी यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी दिली आहे.

या आय.सी.यु. सेंटरमुळे कोणत्याही रुग्णाला अत्यावश्यक सुविधा मिळाल्या नाही, म्हणून प्राण गमवावा लागणार नाही. यासाठी समाजधुरीणांच्या मदतीतून हा प्रकल्प आपण उभा करत आहोत. आपण सर्वांनीही मोठ्या प्रमाणात या प्रकल्पाच्या उभारणीत मदत करावी तसेच या कार्यक्रमाला प्रवरा परीसरातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. विखे पाटील यांनी यावेळी केले.

हेही वाचा -Ram Navami at Sai Temple Shirdi: शिर्डी साई मंदिरात आज पहाटेच्या काकड आरतीने रामनवमी उत्सवाला सुरुवात

ABOUT THE AUTHOR

...view details