महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Trupati Desai on Indurikar Maharaj : 'गौतमी पाटीलचे नाव घेऊन इंदुरीकर स्वतःचे महत्त्व वाढवतात, तुम्हीच पैशाचाच बाजार मांडला'

इंदुरीकर महाराज यांनी प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर टीका केली होती. आम्ही पाच हजार मागितले, तर बाजार मांडला म्हणतात. पण गौतमी पाटीलला तीन गाण्यासाठी तीन लाख देतात, असे वक्तव्य केले होते. यावरून भूमाता ब्रिगेड अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी इंदुरीकरांवर टीका केली आहे.

Trupti Desai
तृप्ती देसाई यांनी इंदुरीकरांवर टीका केली

By

Published : Mar 27, 2023, 3:01 PM IST

तृप्ती देसाई यांनी इंदुरीकरांवर टीका केली

अहमदनगर : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर आणि तृप्ती देसाई यांच्यात नेहमीच वाद होतात. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या वतीने शिर्डीत तीन दिवशीय आयोजित करण्यात आलेल्या महापशुधन एक्सपो 2023 च्या समारोपानिमित्ताने रविवारी कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आपल्या कीर्तनादरम्यान नाव न घेता पुन्हा एकदा गौतमी पाटीलवर निशाणा साधला. तर दुसरीकडे इंदुरीकरांविरोधात पुन्हा एकदा तृप्ती देसाई मैदानात उतरल्या आहेत.



किर्तनाचे आयोजन :या कार्यक्रमादरम्यान धार्मिक संस्कृती विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. रविवाीर या महापशुधन एक्सपो 2023 च्या समारोपानिमित्ताने प्रसिध्द कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तना दरम्यान इंदुरीकर म्हणाले की, कीर्तनकारांनी पाच हजार जास्त मागितले, तर लोक म्हणतात यांनी बाजार मांडला आहे. मात्र तीन गाण्यांसाठी दीड लाख रुपये देतात. तीनच गाणी पण शिट्ट्या? गाडा आला आणि घाटात राडा झाला, असे म्हणतात. आपली संस्कृती टिकवणे गरजेचे असल्याचा सल्ला इंदुरीकर महाराजांनी उपस्थितांना यावेळी दिला आहे.



इंदुरीकर महाराजांवर टीका : तृप्ती देसाई आणि इंदुरीकर महाराज यांच्यामधील वाद महाराष्ट्राला परिचित आहे. महिलांबद्दल अपमान जनक वक्तव्य केले म्हणून तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांच्या विरोधात आंदोलन सुद्धा केले होते. त्यानंतर इंदुरीकर महाराजांचे काही व्हिडिओ युट्युबवरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा इंदुरीकर महाराजांनी महिलांबद्दल वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराजांवर टीका केली आहे.


खरा पैशाचा बाजार :तृप्ती देसाई म्हणाल्या, की एखादी महिला पुढे जात असेल, तर तिच्या नावाने आपले महत्त्व वाढवण्याचे काम इंदुरीकर महाराज करत आहेत. गौतमी पाटीलची सध्या क्रेझ आहे. परंतु, तुम्हाला पैसे तुम्हीच कमवावे असे वाटते. तुम्ही पाच हजार घेतच नाही, तर तुम्ही किती घेता हे सर्वांना माहीत आहे. तुमचा ब्लॅकचा पैसा कुठे जातो? सगळे राजकारणी तुमच्या या कामावर कसे पांघरून टाकतात. हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे खरा पैशाचा बाजार तुम्हीच मांडला आहे. काही चांगले कीर्तनकार आहेत.

महिलांविषयीचे वक्तव्य : कीर्तनातून समाज प्रबोधन करताना समाजाने दिलेल्या मानधन घ्यावे लागते. पैसे मागून घ्यावे लागत नाहीत. पैसे काय फक्त तुम्हीच कमवायचे काय? प्रश्न सुद्धा तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराज यांना विचारलेला आहे. इंदुरीकर महाराजांच्या या वक्तव्यमुळे ते पुन्हा चर्चेत आहेत. इतर वेळी इंदुरीकर महाराज, हे राजकारणावर टीका करत असतात. समाज प्रबोधन करत असतात. परंतु महिलांविषयीचे वक्तव्य त्यांना पुन्हा अडचणीत आणणार का? हे पाहणे महत्वाचे आहे.


इंदुरीकर तृप्ती देसाई वाद :यापूर्वी सुद्धा इंदुरीकर महाराज आणि तृप्ती देसाई यांच्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठा वाद झाला होता. तृप्ती देसाई यांनी महाराजांविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करायची मागणी केली होती. कोर्टाने सुद्धा निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना फटकारले होते. त्यानंतर त्यांचे काही महिला विषयी वक्तव्याचे व्हिडिओ, युट्युब वरून काढून टाकण्यात आले होते. इंदुरीकर महाराजांनी महिलाविषयी वक्तव्य केल्याने पुन्हा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातूनच आता तृप्ती देसाई यांनी महाराजांवर टीका केली आहे.

हेही वाचा : Trupti Desai on Indorikar Maharaj : महाविकास आघाडी सरकारमध्ये हिंमत असेल तर इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा - तृप्ती देसाई

ABOUT THE AUTHOR

...view details