महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

chandrayaan-3 : चंद्रयान 3 ची मोहीम सर्व देशवासीयांसाठी अभिमानास्पद -बाळासाहेब थोरात यांचे गौरवोद्गार - बाळासाहेब थोरात

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ उतरताच देशात ठिकठिकाणी फटाक्यांची आताषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर चंद्रयान 3 मोहिमेतील इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मोठे यश असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत.

chandrayaan-3
काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 10:31 PM IST

प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात

अहमदनगर (शिर्डी) :इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीच्या बळावर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ चंद्रयान -3 चे यशस्वी लँडिंग झाले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेल्या इस्रो या संस्थेचे हे यश व या अभियानातील सर्व शास्त्रज्ञांचा तमाम देशवासीयांसाठी अत्यंत अभिमान असल्याचे गौरवोद्गार, बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत.

आजच्या यशात संशोधकांचे मोठे योगदान : चंद्रयान-3 च्या यशस्वितेबद्दल बोलताना आमदार थोरात म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इस्रो या संस्थेची स्थापना केली. इंदिरा गांधी यांनी अंतरात अंतराळवीर पाठविले. कॅप्टन राकेश शर्मा यांच्याशी झालेला त्यांचा संवाद आजही प्रत्येक देशवासीयाच्या मनात आहे. राजीव गांधी यांनीही या संस्थेला दिशा देण्याचे काम केले. नरसिंहराव यांच्या काळातही या संस्थेने आपली यशस्वी वाटचाल सुरूच ठेवली. आजच्या यशाची पायाभरणी ही केलेल्या या नेतृत्वाचे व संशोधकांचे आजच्या यशात मोठे योगदान आहे.


दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिला देश: भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष चंद्रयान 3 च्या मोहिमेकडे लागले होते. 14 ते 23 ऑगस्ट हा चंद्रयानाचा यशस्वी प्रवास राहिला आहे. इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांनी केलेल्या कामगिरीच्या बळावर आजचा हा सुवर्ण दिन देशवासीयांसाठी उगवला आहे. हा ऐतिहासिक दिन असून प्रत्येकासाठी अभिमानास्पद आहे. चंद्रावर यान उतरवणारा भारत हा चौथा देश असून दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. या अभिमानास्पद कामगिरीमुळे संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. अंतराळात संशोधनास यामुळे शास्त्रज्ञांना अधिक उत्साह आणि ऊर्जा मिळाली आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल इस्रोच्या पायाभरणीपासून योगदान देणाऱ्या सर्व नेतृत्वांचे व सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन असे बाळासाहेब थोरात म्हणाले.


हेही वाचा -

  1. 'नव्या भारताचे नवे उड्डाण', चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर पंतप्रधान मोदींनी केले देशाचे अभिनंदन
  2. Chandrayaan 3: संशोधनाच्या दृष्टिकोनातून पुढील 14 दिवस अत्यंत महत्त्वाचे- चारुदत्त पुल्लीवार
  3. Chandrayaan 3 Landing : चंद्रयान 3 चे यशस्वी लॅंडिंग; पुण्यात बच्चेकंपनीचा जल्लोष...

ABOUT THE AUTHOR

...view details