अहमदनगर - जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील वांगी खिर्डी गावातील भरत जाधव या तरुण शेतकऱ्याने टाकळीभान येथील उपबाजार समितीमध्ये ( Taklibhan Sub Market Committee ) विष प्राशन केल्याची घटना घडली ( ) आहे. २५ टन कांदे घेऊन भरत जाधव हा टाकळीभान येथील उपबाजार समितीमध्ये विकण्यासाठी आले होतो. अडत्याकडे त्यांनी कांदा दिल्या नंतर त्यांना फक्त एक रुपया किलोचा भाव मिळाला. यामुळे भारत निराश आणि हताश झाल्याने त्यांनी बाजार समिती मध्येच विष प्राशन केल्याची घटना घडली ( Attempted suicide of onion grower ) आहे.
बाजार समितीमध्ये विष प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली होती. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी भरतला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. विष प्राशन केल्यानंतर त्याला इतर सहकाऱ्यांनी श्रीरामपूर येथील साखर कारखान्याच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. या ठिकाणी त्याची मृत्यूशी झुंज चालू आहे.