महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bhandardara Varsha Mahotsav : परराज्यातील व्यावसायिकांचा भंडारदरा महोत्सवाला उदंड प्रतिसाद - Adventure tourism information

राज्य पर्यटन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भंडारदरा वर्षा महोत्सवात (Bhandardara Varsha Mahotsav) परराज्यातील अनेक व्यावसायिकांनी उपस्थिती दर्शवत चांगला प्रतिसाद दिला. भंडारदराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन व्यावसायीकांनी दिल्याचे माहिती पर्यटन विभागाचे सहसंचालक सुशील पवार यांनी दिली. तर उर्वरित दोन दिवसांत आणखी उपक्रम राबवणयात येत असल्याची माहिती उपसंचालक मधुमती सरदेसाई यांनी दिली.

Bhandardara Varsha Mahotsav
Bhandardara Varsha Mahotsav

By

Published : Aug 15, 2023, 9:09 PM IST

मधुमती सरदेसाई माहिती देतांना

मुंबई :अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा हे निसर्गरम्य पर्यटन स्थळ (Bhandardara is a scenic tourist spot) आहे. देश-विदेशातील पर्यटकांना या पर्यटन स्थळाची माहिती व्हावी आणि भारतभरातील पर्यटकांना तेथील सर्व लोककला आणि खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता यावा, यासाठी राज्य सरकारने 12 ऑगस्टपासून या ठिकाणी वर्षा महोत्सवाचे आयोजन (Bhandardara Varsha Mahotsav) केले आहे. महोत्सवाचा एक भाग म्हणून कृषी सहलीचे आयोजन देखील करण्यात आले होते. यासाठी गुजरात, राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली, छत्तीसगड, पश्चिम बंगाल या राज्यातील पर्यटक, व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साहसी पर्यटनाची माहिती :यावेळी अभिजित अकोलकर यांनी व्यावसायिक पर्यटकांना भंडारदरा परिसर, तेथील जैवविविधता, इतिहास, भूगोल तसेच प्रस्तावित तसेच चालू असलेल्या साहसी पर्यटनाची (Adventure tourism information) माहिती दिली. येथील स्थळांची माहिती देणारी एक सहल दुसऱ्या दिवशी आखण्यात आली होती. न्हाणी, वसुंधरा, नेकलेस येथील धबधबे पाहून पर्यटकांना खूप आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.

प्राचीन मंदिराविषयी पर्यटकांना माहिती :तर अमृतेश्वर तेथील मंदिराला भेट दिल्यानंतर पर्यटकांनी या मंदिराच्या वास्तू कलेचा आनंद घेतला. महाराष्ट्रातील सुमारे १२ व्या शतकातील प्राचीन मंदिराविषयी पर्यटकांना माहिती देण्यात आली. मंदिराचे बांधकाम, देवदेवता, त्यातील नक्षीकाम याविषयी माहिती पर्यटकांना मार्गदर्शन करण्यात आले. घाटघर धरणाच्या परिसरात फिरताना पर्यटकांनी जंगल, पावसाचा अनुभव, कडे कपारी, दरी, धुके या सगळ्यांची मनमुराद अनुभूती मिळवली. कळसुबाई शिखर येथेही पर्यटकांसाठी विविध उपक्रम घेण्यात आले, अशी माहिती पर्यटन विभाग नाशिकच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई यांनी दिली आहे.

नृत्याचा कार्यक्रमाला पर्यटकांची उपस्थिती : यावेळी महाराष्ट्र पर्यटन विभागाचे सहसंचालक सुशील पवार यांनी देशभरातून आलेल्या पर्यटन व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. याच वेळी कार्यक्रमाचे सह संयोजक संजय नाईक, श्वेता नाईक, संदीप मोरे, अभिजित अकोलकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र पर्यटन व्यावसायिकांचे प्रतिनिधी निरंजन कुलकर्णी, संगीता कळसकर हे उपस्थीत होते. आदिवासी बांधवांचे पारंपारिक कलाकौशल्य, चित्रकला आणि नृत्याचा कार्यक्रमाला उपस्थितांनी मनापासून दाद दिल्याचे सुशील पवार यांनी सांगितले.

हेही वाचा -

  1. Diwali tourism : आंबोली घाट, चिखलदरा, भंडारदरातील 'या' ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका
  2. अहमदनगरमधील भंडारदरा धरण 80 टक्के भरले
  3. Kalsubai Peak : कळसुबाई शिखरावर अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका

ABOUT THE AUTHOR

...view details