महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीत बिअर शॉपीमध्ये चोरी; ६० हजारांची रोकड, २० बीअरच्या बाटल्या लांबवल्या - beer shop near shirdi

काल मध्यरात्रीच्या सुमारास, शिर्डी पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या नगर-मनमाड महामार्गवरील 'बी. एम. बिअर & वाईन शॉपी' चे कुलुप तोडून, आत ठेवलेली साठ हजार रुपयांची रोख रक्कम आणि वीस बिअरच्या बाटल्या चोरट्यानी लंपास केल्या.

beer-shop-near-shirdi-police-station-robbed-by-a-gang-yesterday-midnight

By

Published : Aug 17, 2019, 4:54 PM IST

अहमदनगर - शिर्डीत जेवढे साईभक्त येतात, त्यामध्ये एक चतुर्थांश देशभरातील चोरही असतात. म्हणूनच, चोरी हा प्रकार शिर्डीत रोजचाच झाला आहे. झटपट मिळणारा पैसा बघता, शिर्डीत चोरांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. यातील काही चोरांनी शिर्डी पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या नगर-मनमाड महामार्गवरील 'बी. एम. बिअर & वाईन शॉपी' चे मध्यरात्रीच्या सुमारास कुलुप तोडून साठ हजार रुपयांची रोख रक्कम आणि वीस बिअरच्या बाटल्या चोरट्यानी लंपास केल्या.

शिर्डी : पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणारी बिअर शॉपी चोरट्यांनी फोडली, तक्रारीनंतर तपास सुरू

बिअर शॉपीच्या आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून, कॅमेऱ्यांचे डीवीआर मशीनदेखील चोरट्यांनी पळवून नेले आहे. आज सकाळी ही बाब दुकानाचे मालक संदीप पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती शिर्डी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत पंचनामा केला आहे. यानंतर या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details