अहमदनगर- कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. १४ एप्रिल पर्यंत देशात सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सोडून बाकी सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील लाकडाच्या फळ्यांपासून आकर्षक बॅट बनविणाऱ्या व्यवसायिकांना देखील नुकसान होत आहे.
बॅट बनवणाऱ्यांना लॉकडाऊनचा फटका; सरकारकडे मदतीची मागणी - बॅट व्यवसायिक अहमदनगर
रस्त्यावरील फुटपाथवर बसून हे व्यावसायिक बॅट निर्मिती करतात. मात्र कोरोनामुळे त्यांचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. लॉकडाऊनमुळे लोकांनी घराबाहेर निघने बंद केले. मुलं बागेत, मैदानावर खेळताना दिसण्याचे बंद झाले आहे. त्यामुळे, बॅट खरेदीवरही परिणाम झाला आहे.
समाजात अनेक दुर्बल, दुर्लक्षित व गरीब घटक आहेत. जे हातावर पोट भरणारे आहेत. कोरोनामुळे त्यांचा व्यवसाय लयाला जाण्याच्या मार्गावर आहे. या व्यवसायिकांमध्ये लाकडापासून विविध वस्तू बनवणारे व्यावसायिक देखील आहेत. रस्त्यावरील फुटपाथवर बसून हे बॅट निर्मिती करतात. मात्र कोरोनामुळे हे सर्वजणअडचणीत सापडले आहेत. लॉकडाऊनमुळे लोकांनी घराबाहेर निघणे बंद केले. मुलं बागेत, मैदानावर खेळताना दिसण्याचे बंद झाले आहे. त्यामुळे, बॅट खरेदीवरही परिणाम झाला आहे. व्यवसायात मंदी आल्याने आता जगावे कसे हा प्रश्न या सर्वां समोर उभा ठाकला आहे. सरकारने आम्हाला मदत करावी, अशी मागणी या व्यावसायिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा-कौतुकास्पद..! वीरपत्नीची मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५१ हजाराची मदत