शिर्डी (अहमदनगर) :संगमनेर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. लग्न, वाढदिवस, पार्ट्या यामुळे, तसेच बाहेरुन आलेले लोक यांच्यामुळे संसर्ग मोठया प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे येत्या काळात गर्दीच्या ठिकाणी नियंत्रण आणावे लागेल. तसेच जनतेनेही स्वयंशिस्त पाळावी, अन्यथा लॉकडाऊनसारखा निर्णय घ्यावा लागेल असे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.
...तर संगमनेरमध्ये लागू होणार लॉकडाऊन; बाळासाहेब थोरातांचा इशारा - बाळासाहेब थोरात संगमनेर
संगमनेर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे येत्या काळात गर्दीच्या ठिकाणी नियंत्रण आणावे लागेल. तसेच जनतेनेही स्वयंशिस्त पाळावी, अन्यथा लॉकडाऊनसारखा निर्णय घ्यावा लागेल, असे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.
भाजीपाला बाजार, दुकाने, बाजार समिती याठिकाणची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढील काळात प्रयत्न करावे लागणार आहेत. लोकांनी नियम पाळले नाहीत, तर येणाऱ्या काळात संगमनेरमध्ये लॉकडाऊन लागू करावा लागणार असल्याचे संकेत थोरात यांनी दिले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले पाहिजे. मात्र, ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे असेही ते म्हणाले. तर, प्रयोगशाळेत चाचण्यांचा अहवाल येण्यास वेळ लागत असल्यामुळे रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. संगमनेरमध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी आता एनसीसी आणि होमगार्डचीही मदत घेतली जाणार असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.
संगमनेर शहर आणि तालुक्यात आजपर्यंत 349 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्याही संगमनेरमध्येच आहे. तसेच, तालुक्यात 14 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, राज्याच्या तुलनेत संगमनेरचा रुग्ण बरे होण्याचा दर आधिक (62 टक्के) आहे. सध्या संगमनेर मध्ये 115 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.