अहमदनगर -मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर नक्षलवाद्यांनी काढलेल्या पत्रकारावर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी प्रतिक्रिया देताना जे नक्षलवाद्यांना कळते ते सरकारला कधी कळणार, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विनायक मेटे यांच्या बोलण्यात राजकारण असते ते कधीही मराठा समाजाच्या हिताचे बोलत नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे सांगत पलटवार केला आहे.
विनायक मेटे मराठा समाजाच्या हिताचे बोलत नाही, बाळासाहेब थोरातांचा पलटवार 'केंद्र सरकारची ही कृती निषेधार्थ'
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आज संगमनेर दौऱ्यावर आहे. यावेळी थोरात म्हणाले, की कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना पेट्रोल आणि डीझेलच्या किमतीत वाढ होत असल्याने केंद्र सरकारची ही कृती निषेधार्थ असल्याचे ते म्हणाले. महामंडळ करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तसेच राम शिंदे व अजित पवार यांची भेट ही राजकीय भेट नसून ती एक व्यक्तिगत भेट असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिर्डी साईबाबा संस्थानवर विश्वस्त मंडळ नेमण्याबाबत उच्च न्यायालयाने पण राज्यसरकारला सांगितले असल्याने लवकरात लवकर साई संस्थानमंडळ नेमण्यात येणार असल्याचे यावेळी थोरात यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -आमच्या रक्तामध्येच शौर्य; आम्हाला नक्षलवाद्यांचा फुकटचा सल्ला नको - मराठा संघटना