अहमदनगर -पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची आजची भेट फार आश्चर्याने घेण्याची गरज नाही. अनेक विषयांबाबत चर्चा करण्यासाठी पवार पंतप्रधानांना भेटले असतील, असे सांगत काँग्रेसचे जेष्ठ नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारच्या मोदी-पवार भेटीवरील तर्कवितर्कांना लगाम घालण्याचा प्रयत्न केला.
साई संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेले का?
यापुर्वी काँग्रेसकडे असलेले साई संस्थानचे अध्यक्षपद आता राष्ट्रवादीकडे गेले का? याबाबत विचारले असता, यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, आम्हाला सत्तेतील वाटा योग्य पद्धतीने मिळत आहे. लवकरच विश्वस्त मंडळाची नियुक्ती होईल, असे स्पष्ट केले.
पुढील काळ काँग्रेसचा
शिर्डी मतदारसंघात पुढील काळ काँग्रेसचा असेल. शिर्डी व राहाता नगरपालिकेच्या तयारीला लागा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. अनेकदा काँग्रेसला कठीण प्रसंगातून जावे लागले. त्यातुन पक्ष उजळून बाहेर पडल्याचा इतिहास आहे. शेतकरी आंदोलन, कोरोनाच संकट मोदी सरकारकडून दुर्लक्षीत झाल्याचा आरोपही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केला.
हेही वाचा -VIDEO : धगधगत्या आगीत उभे राहून टीडीपी कार्यकर्त्यांचे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन
हेही वाचा -पोटाच्या ऑपरेशनकरिता केली बचत, उंदरांनी कुरतडल्या 2 लाखांच्या नोटा