महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कॉंग्रेस विचारांवर श्रद्धा असलेला नेता आम्ही गमावला - बाळासाहेब थोरात - अहमदनगर जिल्हा लेटेस्ट न्यूज

काँग्रेस पक्षाचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. तरुण वयातच देशपातळीवर नावलौकीक कमावलेला, लोकशाही आणि काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा असलेला नेता आम्ही गमावला आहे. अशा शद्बात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली.

बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात

By

Published : May 17, 2021, 7:11 PM IST

अहमदनगर -काँग्रेस पक्षाचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. तरुण वयातच देशपातळीवर नावलौकीक कमावलेला, लोकशाही आणि काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा असलेला नेता आम्ही गमावला आहे. अशा शद्बात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली.

खा. राजीव सातव यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करून थोरात म्हणाले की, खा.राजीव सातव यांचे काम मी जवळून पाहिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पंचायत समिती सदस्य ते खासदार प्रत्येक जबाबदारी पार पाडत असताना गरीब, कष्टकरी जनता, तरुण व शेतकर्‍यांचे प्रश्न ते अत्यंत तळमळीने मांडत असत. आपल्या कामाच्या ताकदीवर ते कमी वयात देश पातळीवरच्या राजकारणात पोहोचले. आमदार, खासदार म्हणून त्यांनी आपल्या कामाची वेगळी ओळख निर्माण केली होती. समाजिक राजकीय प्रश्नांची त्यांचा उत्तम जाण होती. विविध विषयांचा अभ्यास, संघटन कौशल्य, अभ्यासू, मनमिळावू, सर्वांना सोबत घेऊन चालणारा त्यांचा स्वभाव होता.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष व त्यानंतर अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी तरुणांचे मोठे संघटन उभे केले. खासदार म्हणून संसदेत काँग्रेस पक्षाची भूमिका ते भक्कमपणे मांडत असत. कृषी कायद्याला तीव्र विरोध करत राज्यसभेत त्यांनी पक्षाची बाजू समर्थपणे मांडली. त्यांना तीनवेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. संविधान, लोकशाही व काँग्रेस विचारांसाठी संघर्ष करण्याची त्यांची तयारी असायची. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर काँग्रेस पक्षाची सर्वोच्च समिती असणा-या काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्यपदी त्यांची निवडण करण्यात आली होती. राजीव सातव यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबाची व काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. आम्ही सर्व या कठिण प्रसंगी सातव कुटुंबीयांसोबत असून, त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याचे बळ मिळो अशी ईश्वराकडे मी प्रार्थना करतो. असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

'काँग्रेस पक्षाची मोठी हानी'

काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत पाईक म्हणून राष्ट्रीय पातळीवर खा. राजीव सातव यांनी मोठी जबाबदारी सांभाळली. बाळासाहेब थोरात व खासदार राजीव सातव यांचा मोठा स्नेह होता. खासदार सातव हे सातत्याने संगमनेरला विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपस्थित राहिले आहेत. विविध भाषांवर प्रभुत्व, उत्तम संघटन कौशल्य, प्रभावी वकृत्व , यामुळे त्यांनी पक्षातील अत्यंत महत्त्वाच्या अशा राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये मानाचे स्थान मिळवले होते. त्यांच्या निधनाने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे, अशा भावना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा -मुंबई शेअर बाजार ८४८ अंशांने वधारला ; 'हे' आहे कारण

ABOUT THE AUTHOR

...view details