अहमदनगर- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपला उमेदवारी अर्ज संगमनेर प्रांत अधिकारी यांच्याकडे दाखल केला. सकाळी 11 वाजता बाळासाहेब थोरात यांच्या भगीनी दुर्गाताई तांबे आणि पत्नी कांचन थोरात यांनी औक्षण केल्यानंतर थोरात यांनी सुदर्शन निवास स्थानापासून मिरवणूक काढत प्रांत कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला.
बाळासाहेब थोरातांचा उमेदवारी अर्ज दाखल हेही वाचा - भाऊसाहेब कांबळेंच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध
यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे उपस्थित होते. यावेळी युतीमध्ये ताळमेळ नसून संशयास्पद वातावरण असल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. 5 वर्षे सत्तेत असूनही शिवसेनेला पीक विम्यासाठी आंदोलन करावे लागले. शिवसेना-भाजप एकत्र लढले तरी त्यांच्यात आलबेल नसल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचा टोला थोरातांनी लगावला. तर जनतेच्या आशीर्वादाने आपला विजय निश्चित असल्याचे थोरात यांनी सांगितले. आघाडीचे सरकार पुन्हा एकदा राज्यात येणार, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - अहमदनगरमधील ४२८ जणांचे शस्त्र परवाने रद्द, १ हजार १४१ जणांना जमा करण्याचे आदेश