अहमदनगर - केंद्रात सत्ता स्थापनेनंतर आज लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाबाबत विविध क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. महिलांना एका लाखापर्यंतच मुद्रा लोन देणार असल्याची घोषणा या अर्थसंकल्पात केल्याने शिर्डीत बचत गटाच्या महिलांनी फटाके फोडून या अर्थसंकल्पाचे स्वागत केले. तर विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी या अर्थसंकल्पामुळे जनतेची निराशा झाली असून शेतकऱ्यांना यात स्थान दिले गेले नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
केंद्रीय अर्थसंकल्प : शिर्डीत कुठे जल्लोष तर, कुठे नाराजी; बचत गटाच्या महिलांनी फोडले फटाके - Ahmednagar
शिर्डीत बचत गटाच्या महिलांनी फटाके फोडून आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले.
फटाके फोडताना महिला
अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजार कोसळला. त्यामुळे हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे मत थोरातांनी व्यक्त केले. तर शेतकरी नेते अजित नवले यांनी हे बजेट केवळ बोलाची कढी असल्याची टीका केली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्याने शेतमालाचा उत्पादन खर्च वाढणार आहे. शेती आणि ग्रामीण विकासाची केवळ भाषा करायची मात्र, आर्थिक तरतूद करायची नाही, असा खेदजनक हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया नवले यांनी व्यक्त केली.
Last Updated : Jul 5, 2019, 10:09 PM IST